Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआयटकचे कामगार नेते कॉम्रेड शरद गोडसे यांचे आकुर्डीत निधन !

आयटकचे कामगार नेते कॉम्रेड शरद गोडसे यांचे आकुर्डीत निधन !

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : ग्रीव्ह्ज कॉटन अलाईड एम्प्लॉईज युनियनचे (आयटक) माजी उपाध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड मधील कामगार नेते कॉम्रेड शरद दत्तात्रय गोडसे (वय 83) यांचे आकुर्डी येथे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. 1970 च्या दशकात पिंपरी चिंचवड मधील कामगारांनी कामगारांच्या हक्कासाठी लाल बावट्या च्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक लढे केले,त्यातील ते अग्रणी नेते होते.

“गेली 50 वर्षे ते कामगार चळवळीत काम करत होते. ग्रीव्ह्ज ग्रुप मधील कंपन्या मध्ये आकुर्डी येथील 1971 ते 1978 च्या मोठ्या कामगार संघटना लढ्यातील ते लढाऊ कार्यकर्ते होते. पिंपरी चिंचवड मधील कामगारांच्या विविध लढ्यात त्यांनी लाल बावट्या च्या नेतृत्वाखाली सहभाग घेतला होता.भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आयटक या मोठया संघटनेमध्ये त्यांनी 50 वर्षे निष्ठेने काम केले.”

– डॉ.सुरेश बेरी, जेष्ठ नेते

“कॉम्रेड गोडसे डाव्या चळवळीतील ध्येयनिष्ठा कम्युनिस्ट कार्यकर्ते होते, काही वर्षे ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये सक्रिय होते. पिंपरी चिंचवड शहरात कामगार चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी चळवळीचे केंद्र असावे, या एकाच भावनेतून त्यांनी श्रमशक्ती भवनच्या उभारणीत मोठे योगदान दिले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत.”

– अजित अभ्यंकर, जेष्ठ नेते
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

“गेली 40 वर्षे कामगार चळवळीतील विविध आंदोलनामध्ये लाल बावट्याचा विचार कामगार कार्यकर्त्यांना दिला. आकुर्डीतील श्रमशक्ती भवन येथे कामगार संघटना संयुक्त कृती समितीतील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना वैचारिक प्रशिक्षण देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे ते आयोजक होते. त्यांनी चळवळीला वैचारिक दिशा देण्याचे काम केले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत.”

– किशोर ढोकले, अध्यक्ष
राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ

1970 ते 1990 च्या दशकातील पिंपरी चिंचवड कामगार चळवळीतील एक लढाऊ व्यक्तिमत्व होते. रस्टन, डेव्हिड ब्राऊन या ग्रीव्ह्ज ग्रुप मधील कामगारांचा दिर्घकाळ चाललेल्या आणि औद्योगिक संघर्षाला दिशा देणारा या लढ्यात त्यांचे खूप मोठे योगदान होते.

– मानव कांबळे, अध्यक्ष
नागरी हक्क सुरक्षा समिती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय