पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ज्ञानविस्तार कार्यक्रमांतर्गत सायबर सुरक्षा आणि आहार व आरोग्य या विषयावर दोन दिवसीय व्याख्यान कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांचे सूचनेनुसार व प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. (PCMC)
व्याख्यानाच्या प्रथम पुष्पा मध्ये डॉ. हर्षिता वाच्छानी यांनी, संगणक व मोबाईल मध्ये कोणत्या प्रकारची माहिती साठविलेली असते. सोशल मीडियाचे धोके काय आहेत, आणि प्रसंगी आपण सुरक्षित व सावध कसे राहायचे या विषयावर सर्विस्तर माहिती सांगितली तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे समर्पकपणे निरसन देखील केले, तर टिळक शास्त्र महाविद्यालयाचे डॉ सुरेश इसावे यांनी गुन्हा घडला तर तक्रार कशी नोंदवावी. गुन्हे घडू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी हे स्पष्ट करून सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा गायकवाड यांनी, गुन्हे टाळण्यासाठी संगणक मोबाईल याचा वापर काळजीपूर्वक करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा .सुशील भोंग यांनी केले. विद्यार्थिनी प्रियंका श्रीवास्तव, शितल पुरी यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. चारुशीला रणदिवे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार शीतल डुंबरे यांनी मानले. (PCMC)
व्याख्यानकलेच्या दुसऱ्या दिवसाचे प्रथम सत्रात आहार आणि आरोग्य या विषयावर प्रा. तुलिका चतर्जी यांनी दैनंदिन आहाराबाबत माहिती दिली. तर दुसऱ्या सत्रात डॉ. ज्योस्ना लगस यांनी आरोग्य संदर्भात काय काळजी घ्यावी याबाबत माहीती सांगताना दिवसाची सुरुवात कोमट पाणी पिऊन करावी असे स्पष्ट करून दिवसभरातील आहार कसा असावा , याबाबत सर्विस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले. (PCMC)
कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम यांनी विद्यार्थ्यांनी आहार आणि आरोग्य या संदर्भात जाणीवपूर्वक कोणकोणती काळजी घ्यावी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. विभाग प्रमुख प्रा सुशील भोंग यांनी आभार मानले.
दोन दिवसीय व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी प्रा. मनीषा पाटील, प्रा गीता कांबळे, प्रा अस्मिता यादव, प्रा संतोष उमाटे, प्रा पल्लवी चव्हाण, प्रा हर्षदा जगताप, ग्रंथपाल महेश दुशिंग, भावना काकडे, रवींद्र नलावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : चिंचवड येथील प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयात दोन दिवशीय व्याख्यानमाला संपन्न
---Advertisement---
- Advertisement -