Friday, April 26, 2024
HomeNewsकेरळच्या माजी आरोग्य मंत्री के. के. शैलेजा यांना प्रतिष्ठित 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार,...

केरळच्या माजी आरोग्य मंत्री के. के. शैलेजा यांना प्रतिष्ठित ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार, मात्र “या” कारणामुळे नाकारला पुरस्कार

नवी दिल्ली : केरळच्या माजी आरोग्य मंत्री के. के. शैलेजा यांनी करोना आणि निपाह या विषाणूच्या विरोधात केलेले काम देशासह अवघ्या जगानं पाहिल़ं. शैलेजा यांच्या कामाची चर्चाही मोठी झाली. त्यांच्या या कामासाठी आशियाचा नोबल पुरस्कार म्हणून संबोधला जाणारा प्रतिष्ठित ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार देण्यात येणार होता. मात्र त्यांनी तो नाकारला आहे.

करोना आणि निपाह विषाणूच्या प्रसारादरम्यान केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी के. के. शैलेजा यांना २०२२ सालाचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार देण्यात येणार होता. मात्र, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या CPI(M) नेत्या शैलेजा यांनी पक्षाशी चर्चा केल्यानंतर हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.

फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. “मॅगसेसे हे कम्युनिस्ट विरोधी होते. एक व्यक्ती म्हणून माझा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. मात्र मी एक राजकारणी असल्यामुळे यासंदर्भात पक्षाशी चर्चा केली. त्यानंतरच हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुरस्कारासाठी माझ्या नावाचा विचार करण्यात आला, याबाबत मी पुरस्कार समितीची आभारी आहे”, अशी प्रतिक्रिया शैलेजा यांनी दिली आहे.

‘रॅमन मॅगसेसे’ हा आशियातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना १९५७ पासून हा पुरस्कार देण्यात येतो.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय