Sunday, December 22, 2024
Homeजिल्हाभीषण अपघात : मुंबई - पुणे महामार्गावर भीषण अपघात, माय लेकीचा मृत्यू

भीषण अपघात : मुंबई – पुणे महामार्गावर भीषण अपघात, माय लेकीचा मृत्यू

पिंपरी चिंचवड : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांना कंटेनरने धडक दिल्याने माय लेकीचा मृत्यू झाला.

किवळे – देहूरोड परिसरात ही घटना घडली आहे. अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. देहूरोड किवळे ब्रिजवर दुचाकीला कंटेनरने मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी आहेत, जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आई आणि मुलीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे. देहूरोड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

दक्षिणी कमांड पुणे येथे लघुलेखक, कुक, सफाईवाला, चौकीदार पदांसाठी भरती, 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 9 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे विविध पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी


संबंधित लेख

लोकप्रिय