Wednesday, January 22, 2025

नचिकेत बालग्राम, मातृसेवा विद्यामंदिर येथे शिक्षकाने केला मुलांसोबत वाढदिवस साजरा

पिंपरी चिंचवड : चिंचवड येथील देव-दर्शन कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.दिपक जाधव सर यांनी आपला 35 वा वाढदिवस नचिकेत बालग्राम, बिजलीनगर, चिंचवड येथे गरीब आणि उपेक्षित मुलांना खाऊ, स्नॅक्स आणि बुंदीचे लाडू देऊन साजरा केला.

राहुल ब्रम्हेचा स्मृती संस्थेमार्फत नचिकेत बालग्राम येथे समाजातील आर्थिक दुर्बल, उपेक्षित, मातापित्यांचे छत्र नसलेल्या 6 ते 18 वयोगटातील 50 हुन जास्त मुला मुलींचे  संगोपन करून शिक्षण दिले जाते.

१० वी, १२ वी आणि पदवीधरांसाठी सुवर्णसंधी : कर्मचारी राज्य विमा निगम मध्ये ३८४७ पदांची मेगा भरती

यावेळी प्रा.दिपक जाधव म्हणाले की, मी आणि माझी पत्नी दरवर्षी आमच्या घरातील वाढदिवस गोरगरीब वस्तीतील लोकांना काही जीवनावश्यक वस्तु, भोजन, स्नॅक्स देऊन साजरा करत असतो. समाजाची एक विकसित स्थिती आसपास आपण पहात असतो, मात्र अजूनही उपेक्षितांचे वेगळे जग शहरात आहे. उपेक्षित मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांमध्ये वाढदिवस साजरा करून मी इथे फक्त कर्तव्य करत आहे. प्रा.वैशाली गायकवाड यांनी मुलांसमोर एक गाणे सादर केले.

मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत

केळी खाण्याचे फायदे व तोटे जाणून घ्या !

नचिकेत बालग्रामचे संचालक डॉ.भालचंद्र ब्रम्हेचा यांनी संस्थेची माहिती देताना सांगितले की, देशात अनाथ मुलांची संख्या फार मोठी आहे. गरिबी आणि आई वडिलांचे छत्र हरवलेल्या या मुलांचे संगोपन केले नाही तर ही मुले चुकीच्या मार्गाकडे वळतात. शिक्षण, श्रम आणि सांस्कृतिक संस्कार या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन गेली 21 वर्षे आम्ही करत आहोत. इथे आठवी पर्यंत शिक्षण दिले जाते. दानशूर लोक आम्हाला अन्नधान्य, औषधे, जीवनावश्यक मदत करतात. रोख रकमेतून दान मिळते.

ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’

संस्थेचे संचालक सिद्धार्थ ब्रम्हेचा, नयना मावळे यावेळी उपस्थित होते. शयनाज शेख, दिलीप पेटकर, यल्लमा कोलगी, वंदना शिवशरण, संगीता देवळे, पिंटू जमादार, दुर्गाराव ईल्ला, राहुल बिराजदार, रामकिसन केंद्रे, सविता आव्हाड यांनी मुलांना स्नॅक्स, लाडू वाटप केले.

– क्रांतिकुमार कडुलकर


Related Articles

- Advertisement -

Latest Articles