Photo : facebook (Maruti Wayal) |
जुन्नर : येथील कुकडेश्वर आदिवासी हिरडा प्रकल्पास अर्थसाहाय्य मिळावे या मागणीसाठी हिरडा कारखान्याचे अध्यक्ष काळू शेळकंदे यांच्यासोबत नॅशनल आदिवासी पीपलस् फेडरेशनचे अध्यक्ष मारुती वायाळ देखील 26 जानेवारी पासुन प्राणांतिक उपोषण करणार आहे, या संबंधीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ईमेल द्वारे पाठविण्यात आले आहे.
मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत
श्री. कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेची १५ मार्च १९९९ रोजी नोदणी झाली असून जुन्नर, आंबेगाव, खेड व मावळ तालुक्यातील हिरडा उत्पादक आदिवासी शेतकऱ्यांनी एकत्र येवून हिरडा या फळावर प्रक्रिया करून आर्थिक उन्नतीसाठी आदिवासी शेतकऱ्यांनी ही संस्था स्थापन केली.
पुणे : जुन्नर येथील हिरडा प्रकल्पास अर्थसाहाय्य मिळण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी
हिरड्याला आदिवासी महामंडळाकडून अल्प प्रमाणात बाजार भाव मिळत होता. त्यामुळे संस्थेने हिरड्यावर संशोधन करून त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादित मालाला जागतिक बाजारपेठ असल्याचे निश्चित केले. प्रकल्प उभारणीसाठी जवळपास तीन हजार शेतकरी सभासदांनी शेअर्स रूपाने ६७ लक्ष रुपये जमा केले. मात्र संस्थेचा प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी अजूनही काही कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
जुन्नर : काळू शेळकंदे हे प्राणांतिक उषोषण करणार !
हा प्रकल्प आदिवासी भागासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व रोजगार निर्मितीस चालला देणारा आहे या पार्श्वभूमीवर प्रकल्पासाठी आवश्यक असणारी रक्कम शासनाने द्यावी, अशी मागणी नॅशनल आदिवासी पीपलस् फेडरेशनच्या वतीने केली आहे. अन्यथा संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी देखील 26 जानेवारी रोजी प्राणांतीक उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती मारुती वायाळ यांनी दिली.
10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी ! परीक्षेविना मिळेल रेल्वेत नोकरी, 2422 जागा; आजच अर्ज करा !