वॉशिंग्टन : एलियन्स म्हणजेच परग्रहवासीयांचे अस्तित्व आहे की नाही हे अद्याप अधिकृतरीत्या समजलेले नसले तरी त्याबाबत वेळोवेळी भन्नाट दावे केले जात असतात. ‘यूफो’ आणि एलियन्सबाबतच्या एका समीक्षा अहवालास अमेरिकन गुप्तचर अधिकार्यांनी लिक केले आहे. या रिपोर्टमध्ये अनेक चकीत करणारे खुलासे आहेत. विशेष म्हणजे आता एका अधिकार्याने एलियन्स आकाशातून नव्हे तर समुद्रातून जमिनीवर येत असल्याचेही म्हटले आहे.
मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत
या गुप्तचर अहवालात 120 पेक्षाही अधिक वेळा आकाशात अज्ञात वस्तू पाहिल्या गेल्याचे म्हटले आहे. गेल्या वीस वर्षांमध्ये अमेरिकन नौसेनेने या अज्ञात वस्तूंना वेळोवेळी पाहिले. ‘यूफो’ म्हणजेच ‘अनआयडेंटिफाईड ऑब्जेक्ट’ (अज्ञात वस्तू) असे नाव परग्रहवासीयांशी संबंधित अंतराळयानांना दिले जाते. मराठीत त्यांना ‘उडत्या तबकड्या’ असे त्यांच्या आकारावरून दिलेले नाव आहे. या उडत्या तबकड्या नेमक्या कुठे गायब होतात हा एक प्रश्न आहे. त्यांची ही याने म्हणजे एखादे हायपरसोनिक (अतिवेगवान) विमान आहे का, असाही प्रश्न आहे. त्याबाबत अद्यापही तपास होत आहे.
कुत्रा बनला लेखक; मालकीण बनली लेखनिक!
ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’
अशा वेळीच एक दावा करण्यात आला आहे ज्यामध्ये म्हटले आहे की एलियन्स अंतराळातून नव्हे तर समुद्रातून येतात! इंटरनॅशनल कोएलिशन फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रियल रिसर्च (आयसीईआर) चे उपाध्यक्ष गॅरी हेसेल्टाईन यांनी हा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की यूफो नेमक्या कुठून येतात याबाबतचे संशोधन ‘गेम चेंजर’ ठरू शकते. अमेरिकन नौसेनेच्या एका जहाजाजवळ एक अज्ञात वस्तू दिसल्याचा दावाही एका माजी पोलिस अधिकार्याने केला आहे.
10 वी पास 12 वी पासांना खुशखबर..! नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३०७ जागा