पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे आज (२७ जानेवारी) सकाळी सुमारे ९.१५ वाजताच्या सुमारास निधन झालं आहे. दीर्घ आजाराने पुण्यातील पत्रकारनगर येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. अनिल अवचट पत्रकार, साहित्यिक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.
मराठी साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या पुस्तकं, लेख यांद्वारे मोलाचे योगदान दिले. डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली.
ब्रेकिंग : माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार नाकारला !
त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरांतील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते. डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे.
आज दुपारी दोन वाजेपर्यंत, पत्रकारनगर येथे त्यांचे पार्थिव, अंतिम दर्शनाकरता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातील. अनिल अवचट यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय आहे.
नवजात मुलासाठी आईने प्राण दिल्याच्या व्हायरल पोस्टचे वाचा सत्य !
पुरस्कार व सन्मान
– व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार (२०१३),
– अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (१३-१-२०१८),
– महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार, २०१७ सालचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार इ विविध पुरस्कार .
– क्रांतिकुमार कडुलकर
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा