Sunday, December 22, 2024
Homeजिल्हावाईन जीवनावश्यक वस्तू कशी ते सरकारने स्पष्ट करावे, सरकारच्या वाईन विक्रीच्या नव्या...

वाईन जीवनावश्यक वस्तू कशी ते सरकारने स्पष्ट करावे, सरकारच्या वाईन विक्रीच्या नव्या धोरणावर महिलांची टीका

पिंपरी चिंचवड : छ्त्रपती शिवराय,महात्मा गांधी, विनोबा भावे, संत गाडगे महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात देशी विदेशी दारूवर बंदी घालावी आणि दारूमुक्त महाराष्ट्र करावा अशी महिलांची मागणी गेली अनेक दशके आहे. चंद्रपूर, वर्धा येथील ग्रामसभेत महिलांनी ठराव करून दारूबंदी केली होती. परंतु महसूल मिळावा म्हणून दारुबंदीचे धोरण राबवले गेले नाही.

दारू ही जीवनाचा नाश करते, त्यामुळे दारूवर बंदी असावी, असे गांधीजींना वाटत होते. दारूबंदी केवळ काही राज्यातच नको तर संपूर्ण देशातच हवी. बिहारचे पहिले मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांनी बिहारमध्ये सर्वात प्रथम दारूबंदी केली होती. गुजरात मध्ये दारूबंदी आहे. महाराष्ट्रात दारूबंदी करण्याऐवजी दारू, वाईन विक्रीला प्रोत्साहन देण्याच्या नव्या धोरणाला म्हणजे सुपर मार्केट, किराणा दुकानात वाईन विक्रीला हिरवा कंदील दाखवल्यामुळे सरकारवर टीका होत आहे. शहरातील महिला आणि सुजाण नागरिकांनी वाईन विक्रीच्या धोरणावर टीका केली आहे.

कौशल्य विकास (SKILL INDIA) योजनेअंतर्गत महिला मुलींना मोफत प्रशिक्षण, नोकरीची संधी

सरकारने उद्योगस्नेही धोरण राबवावे. ग्रामीण भागातील कृषी प्रक्रिया उद्योगाना चालना देऊन त्याचे मार्केटिंग करावे. गृहनिर्माण क्षेत्रात सरकार प्रोत्साहन देऊ शकेल. त्यामुळे सरकारला जास्त महसूल मिळेल.

शहरात ७० लाख रुपयांचा एक फ्लॅट विकला तर सरकारला ६ टक्के स्टॅम्प ड्युटी (चार लाख २० हजार रुपये), नोंदणी शुल्क ३० हजार रुपये आणि जीएसटी असा एका ग्राहकामुळे सुमारे आठ लाख रुपयांचा महसूल सरकार मिळतो. याउलट दारु विक्रीतून एवढा महसूल मिळण्यासाठी ८०० ग्राहक लागणार आहेत.

10 वी – 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मध्ये 1501 जागांसाठी भरती

किशोरवयीन व्यसनाधीनता वाढेल – स्मिता जाधव

चिंचवड गाव येथील समुपदेशक स्मिता जाधव म्हणाले, दारू पिऊन त्यात आकंठ बुडुन संसाराची राख-रांगोळी होतांना पाहावलं जात नाही. लहान लहान पोरांचा बाप दारु मुळे मेल्यावर त्यामुलांच्या भविष्य काय असेल, या कल्पना देखील करवत नाही. कमी वयात विधवा बनणाऱ्या आपल्या बहिणी ला समाजात किती वाईट अनुभव रोज येतात या बद्दल कोण बोलणार? दारूचे व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे. 

दारूमुळे कुटुंबात कौटुंबिक हिंसाचार वाढलेला आहे. सुपर मार्केट मध्ये लहान मुलांना वाईन उपलब्ध होऊन किशोरवयीन व्यसनाधीनता वाढेल. दारू पिणे वाईट नाही हे बाळकडू अशा निर्णयाने सरकार देत तर नाहिये ना? याचा पुनर्विचार व्हावा. सरकारने कुटुंब कल्याण मंत्रालयाचा सल्ला घ्यावा.

बांधकाम कामगारांसाठी खुशखबर : अर्थसहाय्याच्या तीन नवीन योजनांना मंजुरी

नागरी संस्कृतीचा ऱ्हास होईल – शैलजा कडुलकर 

चिखली प्राधिकरण येथील महिला बचत गटाच्या शैलजा कडुलकर म्हणाल्या, दारू ही वैयक्तिक समस्या नसून तो एक सामाजिक रोग आहे. पाच दहा रुपयांसाठी भिक मागत हातपाय पसरणारी माणसं आपण पहिलेली असाल. या व्यक्तींना स्वतः चा आरोग्याचा कुटुंबाचा, भविष्याचा कुठलाही विचार येत नसतो. एका जनावरासारखे या व्यक्ती आपले आयुष्य घालवत असतात, दारू पिणारा एकटा दारू नाही पीत. तो आपल्या बरोबर आणखी चार जणांना घेऊन पीत बसतो. लवकर सोबत मिळत नसतील तर तयार करतो म्हणजे एखाद्या साथी सारखा हा व्यसनी दुसरे व्यसनी तयार करतात.

किराणा दुकाने, सुपरमार्केट नागरीवस्तीत असतात. तिथे वाईन विक्रीस ठेवून नागरी संस्कृती सरकारला बिघडवायची आहे काय? द्राक्षे, फळे यापासून आरोग्यवर्धक उत्पादने निर्माण करण्याचे धोरण सरकारने राबवल्यास शेतकऱ्यांचे कल्याण होईल. जागतिक बाजारपेठेत अशा उत्पादनांना मागणी वाढेल आणि सरकारला कायमस्वरूपी महसूल मिळेल.

आभासी अर्थसंकल्प, आर्थिक दिलासा देऊ शकत नाही – अर्थतज्ज्ञ अजित अभ्यंकर

नवरे किराणा आणण्याऐवजी वाईन पिऊन येतील – शेहनाज शेख 

चिंचवड मधील बिजली नगर येथील महिला कार्यकर्त्या शेहनाज शेख म्हणाल्या, नवरे किराणा आणण्याऐवजी किराणा दुकानात वाईन आणतील. घरकाम, मातीकाम, अंगमेहनती काम करून गरीब महिला कुटुंबाला हातभार लावतात. 

सामान्य माणसाला काबाडकष्ट कष्ट करून जेमतेम उपजिविका करण्यासाठी किराणा सामान वेळेवर घेणे शक्य होत नाही आणि जर का अशा परिस्थिती मध्ये किराणा दुकानात वाईन (मद्य) विक्री सुरू केली तर मानसिक दृष्ट्या खचलेला कुटुंब प्रमुख किराणा सामानाऐवजी मद्यपान करून येईल. व मुलबाळ उपाशीच झोपतील व पिऊन येणारा विनाकारण बायकोला मारहाण करेल.

‘अंडे आधी की कोंबडी?’ संशोधकांनी शोधले उत्तर

शेतकऱ्यांचे कल्याण कसे होईल ? – यशवंत कन्हेरे

चिंचवड मधील महात्मा फुले नगर येथील ज्येष्ठ नागरिक यशवंत कन्हेरे म्हणाले, राज्य सरकार महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करत असते. केंद्रसरकारने महाराष्ट्राचा जीएसटीचा वाटा नियमानुसार वेळेवर द्यावा.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथे व्यसनाला विरोध करणारा विचार आहे. वाईन संस्कृतीला विरोध असलाच पाहिजे. परवाना घेणाऱ्या या सुपर मार्केट, किराणा विक्री अस्थापनानी जनभावानेचा विचार करावा. शेतकऱ्यांचे कल्याण होईल, असे अजिबात वाटत नाही. वाईनच्या द्राक्षापासुन पुर्वीपासून वाईन तयार केली जात होती, किती प्रगती झालीय?

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख

लोकप्रिय