Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडबांधकाम कामगाराच्या मुलींच्या लग्नासाठी 51 हजार रुपये अनुदान, कष्टकरी संघर्ष महासंघाच्या प्रयत्नाला...

बांधकाम कामगाराच्या मुलींच्या लग्नासाठी 51 हजार रुपये अनुदान, कष्टकरी संघर्ष महासंघाच्या प्रयत्नाला यश

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र राज्यातील बांधकाम बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरीता 51 हजार रुपये देण्यात येणार आहेत. बांधकाम कामगाराचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याचे शव मूळ गावी पाठविण्यासाठी वाहतुकीचा खर्च महामंडळ करणार आहे. कामाच्या ठिकाणी बांधकाम कामगाराचा अपघात होऊन हात किंवा पाय निकामी झाल्यास कृत्रीम अवयव बसविण्यासाठी सर्व अर्थसहाय्य महामंडळातर्फे केले जाईल, असे आदेश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. अशी माहिती कष्टकरी महासंघाचे नेते काशिनाथ नखाते यांनी दिली आहे.

या तीन नवीन योजनाचा समावेश करण्यात आलेला आहे. याचा लाभ त्वरीत सुरु होईल याचे कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे स्वागत करण्यात आले आहे.

10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! परिक्षेच्या सरावासाठी मिळणार Question Bank !

कामगार मृत्यू होणारे प्रकल्प पाच वर्षासाठी बंद करा – काशिनाथ नखाते

नखाते यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांवर निवेदन देऊन त्या सोडवणे कामी तसेच तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार व  कामगार मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन या योजना सुरु करावी, अशी मागणी नुकतीच मुंबई येथे भेट घेऊन करण्यात आली होती. 

बांधकाम कामगारांची नोंदणी बहुदा लग्नानंतरच होते. अनेक कामगारांना याबाबत माहिती नसते, अविवाहित कामगारांच्या नोंदणीचे प्रमाण कमी असल्यामुळे याची खरंच गरज कामगारांच्या मुलींचे लग्नासाठी आहे. कामगार मुलींच्या लग्नासाठी अनेक वेळा उसनवारी व कर्ज काढतात, म्हणून खरी गरज हे मुलींच्या लग्नासाठी आहे. यासाठी भेट घेऊन चर्चा करण्यात आली होती. हा विषय अनेक दिवसांपासून मंत्रालय स्तरावर प्रलंबित होता त्यामुळे तातडीने हा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केले आहे.  

Mister Mummy : रितेश देशमुख प्रेग्नंट?, ‘मिस्टर मम्मी’चे पोस्टर रिलीज!

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदांच्या ५०० जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय