Sunday, December 22, 2024
Homeराज्यजिओच्या “या” ग्राहकांना मिळणार दोन दिवस मोफत सेवा

जिओच्या “या” ग्राहकांना मिळणार दोन दिवस मोफत सेवा

Photo : Reliance Jio

मुंबई : शनिवारी मुंबईत रिलायन्स जिओची नेटवर्क सेवा 8 तास ठप्प झाली होती, याचा ग्राहकांना मोठा फटका बसला. यावर जिओच्या ग्राहकांनी देखील संताप व्यक्त केला होता. आता रिलायन्स जिओ कंपणीने ग्राहकांना दोन दिवस मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

शनिवारी मुंबई, ठाणे परिसरात रिलायन्स जिओची नेटवर्क सेवा 8 तास ठप्प झाली होती. त्यामुळे जिओचे ग्राहक 8 तास इंटरनेट सेवेपासून दुर होते, याची भरपाई म्हणून रिलायन्स जिओ कंपणीने ग्राहकांना दोन दिवस मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. जे ग्राहक शनिवारी 8 तास इंटरनेट आणि कॉलिंग सेवेपासून दुर होते, त्यांनाच या सेवेचा लाभ मिळणार आहे. त्यात त्यांना त्यांच्या व्हॅलिडिटीवर दोन दिवस वाढवून मिळणार आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय