पिंपरी : शास्त्रीनगर, येरवडा येथे ब्लू ग्रास बिझनेस पार्क येथील व्यवसायिक संकुलाचे इमारतीचा पायासाठी बनवण्यात आलेल्या लोखंडी जाळी चा सांगाडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत मध्ये पाच बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे.
मात्र केवळ समिती स्थापन न करता प्रत्यक्षामध्ये कामगारांच्या सुरक्षेला सुरक्षिततेसाठी पूर्ण जिल्ह्याचे सर्वेक्षण करण्यात यावे, या घटनेत जे जे दोषी आहेत ते ठेकेदार, पर्यवेक्षकासह व मुळ मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कामगार संघटनांनी केला आज कामगार उपायुक्त यांच्याकडे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री, कामगार मंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.
ब्रेकिंग : आता सातबारा उतारा बंद होणार, भूमिअभिलेख विभागाचा महत्वपूर्ण निर्णय
३ फेब्रुवारी संध्याकाळी झालेल्या दुर्घटनेत सोहेल मोहम्मद, मोहम्मद शमीम, मोहम्मद आलम, ताजीब आलम या कामगारांचा मृत्यू झाला होता तर मोहम्मद इब्राहिम, मोहम्मद फईम, मोहम्मद आलम, मोहम्मद रफिक मोहम्मद साहिल हे कामगार जखमी होते. यांचेवर ससून व शहा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून आज त्यांची सर्व प्रतिनिधींनी आज भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली याबाबत अक्षम्य अशा सुरक्षिततेबाबत चुका आढळून आल्या कामगारांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
वर्किंग पीपल चार्टर, कष्टकरी संघर्ष महासंघर्ष, बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र च्या शिष्टमंडळाने चर्चा केली. यामध्ये ज्येष्ठ विधीज्ञ गायत्री सिंग, राष्ट्रीय किमान वेतन आयोगाचे सदस्य चंदन कुमार, कामगार नेते काशिनाथ नखाते ,घर बचाओ घर बनाओ चे बिलाल खान, दीपक पराडकर, डॉ.शैला, राजू वंजारे, मोहम्मद नदाफ आदी उपस्थित होते.
ब्रेकींग : ‘या’ राज्याने केला घरच्या घरी मोफत उपचार देणाऱ्या डायलिसिस योजनेचा शुभारंभ
पुणे जिल्ह्यातील बांधकाम प्रकल्पावर विशेष पाहणी दौरा करून त्यामध्ये सुरक्षित बाबतीत काळजी घेण्यात यावी व ज्यानीं नियम भंग केला आहे. त्यानां बांधकाम प्रकल्प बंद चे आदेश संबंधित व्यवस्थापनाला द्यावेत. जेथे कामगार नोंदणी नाही तेथे कामास स्थगिती द्यावी अशीही मागणी केली. यावर कामगार उपायुक्त गीते आणि कायद्यानुसार त्यांच्यावर ती कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर कामगाराच्या सुरक्षेसाठी विशेष अभियान लवकरच सुरू करु असे त्यांनी आश्वासन यावेळी दिले.
– क्रांतिकुमार कडुलकर