पुणे : तक्षशिला मित्र संघ प्राधिकरण पुणे येथील धम्म उपासक-उपासिका यांच्या उपस्थित रमाबाई जयंती कार्यक्रम तक्षशिला बुद्ध विहार येथे घेण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रंजनाताई निमगडे यांनी केली तर अनेक महिला भगिनींनी आपले मनोगत, कविता आणि गाणी या माध्यमातून रमाई यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला.
प्रमुख उपस्थिती असलेल्या ॲड. मनिषा महाजन यांनी आपले मनोगत मांडतांना संगितले की, त्या काळात देखील जात पंचायत कार्यरत होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्वी ठरलेले लग्न मोडून रमाई यांच्याबरोबर लग्न ठरवताना जातपंचायतीला पाच रुपये दंड भरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रमाई बरोबर लग्न ठरवण्यात आले.
बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी ! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती
जात पंचायत, त्यांची मनमानी, दंड आकारणे व समाजिक बहिष्काराची कुप्रथा तेव्हाही अस्तित्वात होती व आजही अनेक समाजात अस्तित्वात आहे, म्हणूनच महारष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नातून सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा 2017 साली महाराष्ट्र सरकारने पारित केला.
त्या पुढे म्हणाल्या डॉ. बाबासाहेब यांनी परदेशातून रमाई साठी लिहिलेल्या पत्रातून त्यांचे जिव्हाळ्याचे व प्रेमाचे आजही अनुकरणीय आहे, कारण नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असणे खूप गरजेचे आहे. समाजामध्ये समानता, बंधुता निर्माण होण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली, महिलांना उणेपणा आणणाऱ्या रूढी परंपरांचा त्याग करावा असे आपले संविधान सांगते, संविधानातील मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे असं त्या म्हणाल्या .
जाणून घ्या ! कधीही खराब न होणारा हा अन्न पदार्थ
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बौद्धाचार्य रामचंद्र आचलकर यांनी रमाई यांचे त्यागमय जीवन यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले रमाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिक्षण घेत असताना त्यांना भारतातील त्यांच्या गरिबीची व दुःखाची झळ पोहोचू दिली नाही. रमाई नसत्या तर बाबासाहेब घडू शकले नसते असे ते म्हणाले.
तक्षमित्र संघाचे अध्यक्ष प्रतापराव सोनवणे, वंदना रामटेके, आशा बैसाणे, कमल घायतडके, आशा शिंदे, प्रतिमा वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले तर केमुताई रामटेके, शारदा सरवदे, नार्मला वालकर आदींसह उपस्थित होते. आशाताईं शिंदे यांनी आभार यांनी मानले.
– क्रांतिकुमार कडुलकर