पुणे : हडपसरमधील उड्डाणपूल धोकादायक झाला आहे, तिथे काही ठिकाणी हादरे बसतात. त्यामुळे महापालिकेचे कार्यकारी अभियंता इंद्रभान रणदिवे यांनी वाहतूक शाखेला भेट देऊन अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाचे पत्र दिले.
महापालिकेकडून उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. त्यामुळे पालिकेकडून हा उड्डाणपुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. मनपा या उड्डाणपुलाची दुरुस्ती करणार आहे. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक शाखेवर ताण आणि वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हडपसर वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांनी या गोंधळाबाबत माहिती दिली आहे.
त्यागमुर्ती रमाई जयंती उत्साहात साजरी !
झेंडे यांनी सांगितलं की, हडपसर उड्डाणपूल जड वाहनासाठी आम्ही बंद केला होता, मात्र अचानक महापालिकेच्या पथकाने उड्डाणपूलाची पाहणी करून पूर्ण उड्डाणपूल सर्वच वाहनांसाठी बंद केला आहे.
सोलापूर रस्त्याच्या दिशेने जाणारा, शहराकडे येणारा व सासवड रोडच्या दिशेकडून शहराकडे जाणारा असे तिन्ही मार्ग बंद असल्याने आता हडपसर गावातून वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी शक्यतो हडपसर उड्डाणपुलाचा वापर करू नये. उड्डाणपुलाखालील रस्त्याचा वापर करावा.
बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी ! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती
त्यानुसार हडपसर वाहतूक विभागाने हडपसर उड्डाणपूल, सोलापूर रोड व सासवड रोडवरून येणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. संपूर्ण वाहतूक हडपसर गावातून वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांच्या पाच ते सात किलोमीटर रांगा लागल्या आहेत.
– क्रांतिकुमार कडुलकर