Monday, December 23, 2024
Homeराज्यसंजय राऊतांच्या पत्राने राजकीय वर्तुळात भुकंप, केले गंभीर आरोप

संजय राऊतांच्या पत्राने राजकीय वर्तुळात भुकंप, केले गंभीर आरोप

Photo : Twitter/Sanjay Raut

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामुळे केंद्र विरूद्ध राज्य सरकार असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांनी केंद्र सरकार ईडीसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

पत्रात संजय राऊत म्हणतात, “मी माझं राजकीय करिअर तीन दशकांपूर्वी सुरू केलं. मी सुरूवातीपासून शिवसेनेत आहे. सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाराष्ट्रात सत्ता आहे. तसंच 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची भाजपसोबत युती होती. 25 वर्षात दोनदा शिवसेना-भाजप युतीचं सरकारही आलं आहे. काही वैचारिक मतभेदांमुळे आम्ही वेगळे झालो.

बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी ! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती

मात्र आम्ही भाजपपासून वेगळे झाल्यानंतर ही बाब समोर येते आहे आहे की भाजपकडून शिवसेनेच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी अत्यंत पद्धतशीर, नियोजनबद्धरित्या ईडीसारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. फक्त खासदारच नाही तर शिवसेनेच्या आमदारांनाही ठरवून टार्गेट केलं जातं आहे. शिवसेनेत आहेत म्हणून ईडीतर्फे चौकशी केली जाते आहे. काही ना काही आरोप करून चौकशीचा ससेमिरा लावला जातो आहे.

ते पुढे म्हणतात, शिवसेना पक्षाची एक विचारधारा आहे. या विचारधारेवर चालण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. मात्र आम्ही आमच्या विचारधारेवर चालत आहोत याचा अर्थ असा होत नाही की आमच्या पक्षातल्या लोकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जावा. आमच्या पक्षातले खासदार, आमदार, नेते यांना त्यांच्या कुटुंबीयांना धमकावले जात आहे. आमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवारालाही कारवाईची धमकी दिली जाते आहे. पैशांच्या अपहार, पैशांचा गैरव्यवहार केल्याच्या केसेस मागे लावून तपास यंत्रणांमार्फत चौकशी केली जाते आहे.

ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’

पैशांचा अपहार झाला असेल, पैशांचा गैरव्यवहार, भ्रष्टाचार झाला असेल तर जरूर मनी लाँड्रीग प्रकरणात चौकशी केली जावी. मात्र फक्त आरोप लावून सातत्याने त्रास देण्यासाठी यासंदर्भातल्या कायद्याची निर्मिती झाली आहे का? असा प्रश्न आता पडू लागला आहे. केंद्र सरकारच्या ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचेही म्हटले आहे.

कोणत्याही तपास यंत्रणांचा असा गैरवापर एखादा पक्ष अशा प्रकारे करू शकत नाही. आपलं संविधान त्याचा अधिकार देत नाही. या कारवायांमागे तपासयंत्रणांचा हेतू चांगला दिसत नाही. केंद्राच्या आदेशावरून, ज्या राज्यात आपली सत्ता नाही तिथलं सरकार अस्थिर करत राहायचं हा एकमेव उद्देश दिसून येतो असल्याचा गंभीर आरोप या पत्राद्वारे केला आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय