Sunday, December 22, 2024
Homeराज्य...तर ग्रामपंचायत कर्मचारी करणार ९ एप्रिल पासुन पुन्हा कोल्हापुरात बेमुदत आंदोलन

…तर ग्रामपंचायत कर्मचारी करणार ९ एप्रिल पासुन पुन्हा कोल्हापुरात बेमुदत आंदोलन

ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या बैठकीत निर्णय 

नाशिक : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागील अनेक वर्षापासुन विविध प्रलंबित मागण्यांसाठी आयटकशी संलग्न, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील बिंदू चौकात १ जानेवारी पासुन राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती.

तब्बल आठ दिवसानंतर सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन सलग तीन दिवस झालेल्या बैठकीत महासंघाच्या शिष्टमंडळाला मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले होते. त्यानंतरच कोल्हापुरातील सुरु असलेले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.

राज्यपालांच्या आदेशाने जिल्हा परिषदेला जाग, ग्रामपंचायत खैरे – खटकाळे निधी फसवणूक प्रकरण

२७ जानेवारीला मंत्रालयात झालेल्या संयुक्त ऑनलाईन बैठकीत सुध्दा मागण्या मान्य करुन संबंधित वित्त विभागाशी बोलून लवकरच फिजिकल बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही बैठक घेण्यात आली नाही.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अभय यावलकर समितीच्या अहवालातील शिफारशी मान्य करुन त्वरीत वेतनश्रेणी लागु करा, दि .१० ऑगस्ट२०२०च्या कामगार विभागाच्या अधिसुचनेची अंमलबजावणी करुन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनासाठी आर्थिक तरतुद करा, शासनाकडून कर्मचाऱ्यांना  देण्यात येणाऱ्या वेतन अनुदानासाठी असलेली कर वसुलीची आणि उत्पन्नाची जाचक अट रद्द करुन १०० टक्के अनुदान दयावे, कालबाह्य झालेला आकृतीबंध रद्द करावा, ग्रॅच्युटीची मर्यादा वाढविण्यात यावी.

७ नोव्हेंबर राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

आयपीएल २०२२ चा लिलाव सुरू असताना अचानक ऑक्शनर ह्युज एडमेड्स कोसळले

तसेच निवृत्ती नंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शनचा कायदा लागु करा यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी मागील अनेक वर्षापासुन महासंघाच्या वतीने विविध आंदोलनाच्या माध्यमातुन शासन दरबारी पाठपुरावा करत आहे. परंतु शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न केल्या जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. 

१ जानेवारी पासुन कोल्हापुरातील आंदोलना दरम्यान मान्य केलेल्या मागण्यांची आणि मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनांची राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशना पर्यंत पुर्तता न केल्यास कोल्हापुरातील बिंदु चौकात पुन्हा दि .९ एप्रिल २०२२ पासुन राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा आज नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आला. 

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन !

महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा .कॉ. तानाजी ठोंबरे यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला कार्याध्यक्ष कॉ. मिलिंद गणवीर, सरचिटणीस कॉ. नामदेव चव्हाण, सखाराम दुर्गुडे, मंगेश म्हात्रे, बबन पाटील, अँड. सुधीर टोकेकर, अँड. राहुल जाधव, हरिशचंद्र सोनावणे, निळकंठ ढोके श, वसंत वाघ, अमृत महाजन तसेच आयटकचे राज्य सचिव कॉ. राजु देसले यांचे सह महासंघाचे प्रातिनिधी उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय