Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडभाजपच्या सांगवी प्रभाग उपाध्यक्षासह आर पी आय च्या कार्यकर्त्यांचा आम आदमी पार्टी...

भाजपच्या सांगवी प्रभाग उपाध्यक्षासह आर पी आय च्या कार्यकर्त्यांचा आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश

पिंपरी चिंचवड : आज दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सांगवी येथील भाजपचे प्रभाग उपाध्यक्ष सुरेंद्र कांबळे आणि आरपीआय च्या जुन्या कार्यकर्त्या अनिता कांबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत आकुर्डी येथील पक्ष कार्यालयात आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.

सुरेंद्र कांबळे हे मागील पंधरा वर्षांपासून सक्रिय राजकारणामध्ये सहभागी असून आम आदमी पार्टी चे दिल्ली तील काम पाहून पार्टी मध्ये प्रवेश करत असल्याचे सांगितले.

राज्यपालांच्या आदेशाने जिल्हा परिषदेला जाग, ग्रामपंचायत खैरे – खटकाळे निधी फसवणूक प्रकरण

सांगवी येथील शांतीदूत महिला संस्थेच्या मार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबवत असलेल्या अनिता कांबळे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालून सामान्य जनतेला सुविधा देणारा पक्ष म्हणून आम आदमी पार्टीची निवड केल्याचे सांगितले.

यावेळी त्यांचे सहकारी संजय कांबळे, बापू माने, सोमनाथ पवार, आशा कांबळे, लतिका ढवळे, स्मृती बनसोडे यांनीही आप मध्ये प्रवेश केला.

मित्राला सोडविण्याकरिता जात असताना भीषण अपघात, तिघे जागीच ठार

याप्रसंगी आप पिंपरी-चिंचवडचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, शहराध्यक्ष अनुप शर्मा, सामाजिक न्याय विंगचे जिल्हाध्यक्ष वाहाब शेख, आणि शहराध्यक्ष यशवंत कांबळे, शहर सचिव किशोर जगताप, संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाठ, प्रचार प्रमुख राज चाकणे, भोसरी विधानसभा उपाध्यक्ष मंगेश आंबेकर तसेच अशोक तनपुरे, विजय अब्बाड, सरोजनी कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय