Sunday, December 22, 2024
Homeजिल्हाआंबेगाव तालुक्यातील अवैध धंद्यांवर पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

आंबेगाव तालुक्यातील अवैध धंद्यांवर पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील अवैध धंद्यांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण डॉ. अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी सूचना दिल्या होत्या. 

स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, दहशतवाद विरोधी पथक पुणे ग्रामीण तसेच मंचर पोलीस स्टेशनचे वेगवेगळ्या पथकाने दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी कारवाई केल्या. त्यामध्ये साबिर अजगर हरियाणी वय ३१ वर्ष, रा मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे हा नामदेव थोरात त्याच्या सांगण्यावरून मटका घेतो अशी माहिती मिळाल्याने सदर इसमांविरुद्ध कारवाई करून त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम १०, ९९० तसेच मोबाईल व इतर ४००० असा एकुण १४ हजार ९९० किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. 

वृद्ध महिलेच्या १ लाख ४० हजार किमतीच्या शेळ्या चोरणारा भामटा अटकेत – स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

तसेच नामदेव थोरात याच्या सांगण्या वरून मटका घेणारा अमित भोलेश्वर उबाळे वय. ३२ रा. घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे याचे ताब्यातून रोख रक्कम ३००० व मोबाईल इतर ३००० असा एकुण ६००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. नामदेव थोरात वर यापूर्वीचे मुंबई जुगार कायद्याचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत.

तसेच मौजे पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील सानिया किराणा अँड जनरल स्टोअर व राज किराणा अँड जनरल स्टोअर्स येथे छापा टाकून सत्तार भाई कादर भाई तांबोळी वय ५० वर्षे रा.पेठ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे व सिराज कासम भाई तांबोळी वय 27 वर्षे रा. पेठ तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे याचे ताब्यातून एकूण 6450 रुपयाचा अवैद्य पान मसाला तंबाखू (गुटखा) जप्त केला. 

जुन्नर : पेसा क्षेत्रातील अवैध माती उत्खननाबाबत योग्य कारवाई करण्याची मागणी

ही कार्यवाही पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सतिश होडगर, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, एटीएस चे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन मोहिते, मंचर पोलिस स्टेशनचे पोसई सोमेश्वर शेटे, 

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार प्रकाश वाघमारे, विक्रम तापकीर, मुकुंद कदम, पोलिस हवालदार दिपक साबळे, एटीएस चे पोलिस हवालदार ईश्वर जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक संदीप वारे, विशाल बोऱ्हाडे, एटीएस चे पोलिस नाईक मोसीन, पोलिस नाईक आढारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस शिपाई अक्षय नवले, प्राण येवले यांनी केली आहे.

कृषी विभाग आणि कृषि विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने द्राक्ष किंग 2022 चे परीक्षण सुरू

लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी पदांच्या एकूण २२४ जागा

आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !


संबंधित लेख

लोकप्रिय