अकोले : मुतखेल (ता. अकोले) येथील स्वप्निल इदे याने यूजीसी ने घेतलेल्या सहाय्यक प्राध्यापक परिक्षेत समाजकार्य या विषयात ज्युनिअर रिसर्च फेलोशिप मिळवली आहे.
स्वप्निल इदे हा सध्या दिल्ली विद्यापीठात पीएचडी ( Ph.D ) रिसर्च स्कॉलर म्हणुन कार्यरत आहेत. त्याने छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन ऍण्ड रिसर्च या महाविद्यालयातून समाजकार्य विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले.
जुन्नर : स्नेहल साबळे हिचे UGC – NET परीक्षेत यश
स्वप्निल हा 2018 पासून स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ( SFI ) कोल्हापूर मध्ये सक्रिय सदस्य ही आहे. विद्यार्थी प्रश्न, सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी स्वप्निलचा आंदोलन मोर्चात सक्रिय सहभाग राहिला आहे.
स्वप्निल म्हणाला, “ज्युनिअर रिसर्च फेलोशिप मिळाल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. मला यापुढेही समाजासाठी काम करायचे आहे. या यशात मला स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य सचिव मंडळ सदस्य नवनाथ मोरे, जिल्हा अध्यक्ष सर्वेश सवाखंडे, जिल्हा सचिव रत्नदिप सरोदे आणि SFI कोल्हापूर संघटनेने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करतो.”
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 588 जागांसाठी भरती ! आजच अर्ज करा
स्वप्निल पुढे म्हणाला, “आदिवासी, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना मदत लागल्यास मला Swapnilide10@gmail.com ई – मेल वर किंवा +91 90048 86672 मोबाईल नंबर संपर्क करावा.”
12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती
हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या ५८ विद्यार्थिनी निलंबित
कृषी योजना : शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना करायची आहे? अशी करा नोंदणी