Sunday, December 22, 2024
Homeजुन्नरजुन्नर : श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे किल्ले शिवनेरीवर विशेष स्वच्छता अभियान

जुन्नर : श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे किल्ले शिवनेरीवर विशेष स्वच्छता अभियान

जुन्नर : श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी रविवार २० फेब्रुवारी रोजी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता केली.

या स्वच्छता अभियान प्रसंगी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी शेखर पाटील यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श युद्धनीती, १८ पगड जाती जमाती सोबत घेऊन राज्य करणारा राजा, महाराजांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या काडीच्या देठालाही धक्का लागणार नाही, या राज्यांच्या शेतकरी विषयक धोरणाची आठवण विद्यार्थ्यांना याप्रसंगी करून दिली. स्वच्छतेचे कार्य विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन पुढे सुरु ठेवावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक, उपप्राचार्य डॉ. दिपेन्द्र उजगरे तसेच अध्यक्ष प्रतिनिधी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. त्याचबरोबर जुन्नर परिक्षेत्राचे वनपाल रमेश खरमाळे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण जाणीव जागृती विषयी मोलाचा संदेश दिला. 

हे स्वच्छता शिबीर राबवण्यासाठी प्रा. डॉ.राजाराम थोरवे तसेच प्रा. महेंद्र राजपूत व प्रा.मयूर चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे समाजासमोर स्वच्छतेचा व किल्ले संवर्धनाचा एक नवा आदर्श तरुण पिढीसाठी उभा राहिला आहे.

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डा अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

ब्रेकिंग : “या” प्रकरणी लालू यादव यांना पाच वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंडही ठोठावला

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती

संबंधित लेख

लोकप्रिय