मुंबई : काही दिवसांपुर्वी कर्नाटकातील हिजाब वादावरून राजकारण तापलेले होते, हा वाद न्यायालयापर्यत गेला होता आता पुन्हा बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याच्या हत्येनंतर राजकारण तापले असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कर्नाटकच्या शिवमोगा येथे रविवारी रात्री बजरंग दलाच्या एका २६ वर्षीय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. हर्षा असे या युवकाचे नाव आहे. त्याच्या हत्येनंतर कर्नाटकातील काही जिल्ह्यांत जाळपोळीच्या घटना घडल्या असून तेथे तणावाचे वातावरण आहे. या घटनेचे देशभर पडसाद उमटताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावरही हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. या घटनेवर अभिनेत्री रविना टंडनही ट्विट केलं आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विविध पदांसाठी भरती
अभिनेत्री रविना टंडनने ट्वीटरवर #JusticeForHarsha असे लिहत न्यायाची मागणी केली आहे.
#JusticeForHarsha ?????
— Raveena Tandon (@TandonRaveena) February 21, 2022
दरम्यान, बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येचा हिजाब वादाशी संबंध नसल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
बाबा राम रहीमची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दिली झेड प्लस सुरक्षा