Sunday, December 22, 2024
Homeराष्ट्रीयकेरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर विमानात हल्ला

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यावर विमानात हल्ला

कन्नूर : केरळ सोन्याची तस्करी प्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेश याने मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि त्यांच्या कुटुंबावर रोख रक्कम घेतल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर केरळमध्ये सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने केली आहे. ही निदर्शने इंडिगो विमानातही करण्यात आली आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन त्यांच्या मूळ गावी कन्नूरहून त्रिवेंद्रमला जात असताना, सोमवारी इंडिगोच्या विमानातील काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी उड्डाण करण्यापूर्वी सीएम विजयन यांच्या विरोधात निदर्शने केली आणि घोषणाबाजी केली. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला देखील करण्यात आला असा आरोप सीपीएम नेते आणि खासदार डॉ. व्ही शिवदासन यांनी केला आहे. तसेच, त्यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालकांना (डीजीसीए) पत्र लिहून या हल्ल्याची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

केंद्र आणि राज्य सरकारचे आदिवासींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष – वृंदा करात

दरम्यान, गेल्या आठवड्यात सोन्याच्या तस्करीतील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेशने केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी यांच्यावर तस्करीमध्ये हातभार लावत असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर राज्यात निदर्शने तीव्र केली जात आहे. 

10 वी / 12 वी / ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे 338 पदांसाठी भरती

कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख

लोकप्रिय