जुन्नर / आनंद कांबळे : श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर 11 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 2022 या कालावधीत आंबोली (ता. जुन्नर) येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
शिबिरासाठी संस्थेचे अध्यक्ष अॅड. संजय शिवाजीराव काळे यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष निवृत्ती काळे, संस्थेचे खजिनदार कांताताई मस्करे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. देपेंद्र उजगरे उपस्थित होते.
भोसरी ते ओझर, आळेफाटा या दोन मार्गांवर पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याची मागणी
आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांनी रस्ते दुरुस्ती, बंधारे बांधणी, घनकचरा व्यवस्थापन, covid-19 सर्वेक्षण, ग्रामस्वच्छता व स्वच्छतेविषयी जनजागृती, मीनेश्वर मंदिराची संपूर्ण साफ-सफाई केली.
त्यावेळी डॉ. श्रीकांत फुलसुंदर (राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व), प्रा. राथिलाल बाबेल (समाजसुधारक व आजची तरुणाई), प्राचार्य डॉ. इंद्रजीत जाधव (सक्षम युवा समर्थ भारत), कु. वैभव मोरे व सचिन भालचीम (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ) प्रा. जावेद शेख (महिला सबलीकरण आणि युवतींची भूमिका) या.व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अनूसचित जमाती (ST) च्या विद्यार्थ्यांना मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षणाची संधी, आजच संपर्क साधा !
जुन्नर : चिंचोली काशीद येथे प्रस्थापितांना धक्का; जयमल्हार परिवर्तन पॅनेल विजयी
शिबिराच्या समारोपाप्रसंगी संस्थेचे सहसचिव सुभाष कवडे, विश्वस्त अॅड. अविनाश थोरवे, पालक प्रतिनिधी अशोक काळे, प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी यांनी समारोपाप्रसंगी स्वयंसेवकांचे व त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
या श्रमसंस्कार शिबिरासाठी सरपंच नामाबाई मोहरे, पोलीस पाटील, आनंता कोकणे, इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष शिवाजीराव चाळक साहेब, मुख्याध्यापक संजय वाघ, सुभाष मोरे, अंकुश कोकणे ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
‘सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी… म्हणून कमळाबाई ती लाविते काडी, खा.अमोल कोल्हे यांची खोचक कविता
या शिबिराची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विक्रम रसाळ, प्रा डॉ. वंदना नढे, प्रा. स्वप्नील घोडेकर, मयुर चव्हाण, प्रा अंकिता वाळुंज, या सर्वांच्या सहकार्याने शिबिर व्यवस्थित पार पडले. तसेच महाविद्यालयातील प्रा. डॉ. विनायक लोखंडे, जावेद शेख व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासमवेत राष्ट्रीय सेवा योजना या विभागातील सर्व स्वयंसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.