Sunday, December 22, 2024
Homeराज्यमाजी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल, “हे” आहेत गंभीर...

माजी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल, “हे” आहेत गंभीर आरोप

पुणे : माजी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे.

रश्मी शुक्ला यांनी शासनाची दिशाभूल करून बेकायदेशीरपणे काही खासगी व्यक्तींचे फोन टॅप केल्याचे आरोप करण्यात आले होते. या फोन टॅपिंग प्रकरणात शासनाने तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमली होती. आता या समितीने आपला अहवाल राज्य शासनाकडे सादर केला. या टेलिफोन टॅपिंग केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरु असतानाच पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा!

रश्मी शुक्ला यांनी दहशतवादी प्रकरणासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. मात्र, त्याचा महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचे फोन टॅप करण्यासाठी गैरवापर केल्याचा आरोप काही मंत्र्यांनी केला. रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करत असल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच, बेकायदेशीरपणे टॅप करून गोपनीय माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवल्याचा आरोपही शुक्ला त्यांच्यावर करण्यात आला होता.

दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता.

रशिया – युक्रेन युद्धाच्या सावटाखाली प्रेम कहानीच्या व्हायरल होत असलेल्या फोटो मागचे सत्य वाचा !

तर ५ लाख किलोचे स्पेस स्टेशन चीन किंवा भारतावर पाडायचे का? रशियाचा अमेरिकेला इशारा

संबंधित लेख

लोकप्रिय