Sunday, December 22, 2024
Homeजुन्नरजुन्नर : खिरेश्वरची मुलं लई हुशार..!

जुन्नर : खिरेश्वरची मुलं लई हुशार..!

अमोल चिमाजी मुठे


सरबत विकून कुटुंबाला देतात आधार

जुन्नर / हितेंद गांधी : हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी वसलेल्या खिरेश्वर (ता. जुन्नर) या आदिवासी गावातील छोटी मुले संसाराचा गाडा हाकण्यास पालकांना मदत करत आहेत. पिंपळगाव जोगा धरणाच्या लगत वसलेल्या या गावांत पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. 

नुकत्याच झालेल्या महाशिवरात्रीला गडावर जाण्यासाठी हजारो भाविक येथे आले होते. यावेळी चौथीत शिकणाऱ्या छोट्या अमोलकडे लिंबू सरबत पिणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. निरागस चेहरा, हजरजबाबी आणि विनम्रपणा या गुणांवर तो येणाऱ्या पर्यटकांना, भाविकांना खूप भावतो. 

नंदी दुध पित असल्याच्या अफवेने राज्यभर मंदिरात उसळली गर्दी, अंनिसने सांगितले “हे” कारण

दरम्यान या ९ वर्षाच्या अमोल चिमाजी मुठे सोबत विष्णू मराडे, देवयानी भोकटे, अविनाश मुंढे, विशाल रेंगडे, लक्ष्मण मेमाणे आदी मित्रकंपनीही गडावर सरबत विकायला जातात. त्यांना प्रति ग्लासाला २० रुपये मिळतात. 

परिसरातील गौतम डावखर, किरण म्हसकर आदींनी नुकतेच त्याला शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचे शालेय भविष्य घडविण्यास हातभार लावला आहे. येथील जिल्हा परिषदेत शिक्षणाचे धडे गिरविणारा अमोल सुट्टीच्या दिवशी बालवयातील खेळणे- बागडणे सोडून सरबताचे साहित्य घेऊन सकाळीच गडावर दाखल होत असतो. या निसर्गरम्य परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या हाताला शेती व्यतिरिक्त फारसे काम नसून येथे शासनाने पर्यटनपूरक व्यवसाय उभारण्यास आर्थिक मदत करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

महाराष्ट्रातील अनिकेत जाधव याची फुटबॉलपटूची भारतीय फुटबॉल संघात निवड !

सुन भांडखोर आहे, मग न्यायालयाचा ‘हा’ महत्वपूर्ण निकाल जरूर वाचा !

संबंधित लेख

लोकप्रिय