Amit Malviya and Arnab Goswami on FIR : बंगळुरूमध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आयटी सेल प्रमुख अमित मालवीय आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध कॉंग्रेस पक्षाच्या तक्रारीवरून खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 192 (दंगल भडकवण्याच्या उद्देशाने खोटी माहिती पसरवणे) आणि कलम 352 (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा : कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू, 6 जखमी)
Arnab Goswami यांच्याकडून चुकीच्या बातम्या प्रसारित
भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या (INC) तुर्कीतील इस्तंबूल कॉंग्रेस सेंटर हे कॉंग्रेस पक्षाचे कार्यालय असल्याचा खोटा दावा मालवीय आणि गोस्वामी यांनी जाणीवपूर्वक पसरवल्याचा आरोप आहे. ही कारवाई बंगळुरूच्या हाय ग्राउंड्स पोलिस ठाण्यात इंडियन यूथ कॉंग्रेसच्या कायदेशीर सेलचे प्रमुख श्रीकांत स्वरूप बी. एन. यांच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. (हेही वाचा : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन)
तक्रारीनुसार, मालवीय आणि गोस्वामी यांनी तुर्कीतील इस्तंबूल कॉंग्रेस सेंटर हे कॉंग्रेस पक्षाचे आंतरराष्ट्रीय कार्यालय असल्याचा खोटा दावा केला. हा दावा “भारतीय जनतेची दिशाभूल करणे, प्रमुख राजकीय संस्थेची बदनामी करणे, राष्ट्रीय भावना भडकवणे, सार्वजनिक अशांतता निर्माण करणे आणि राष्ट्रीय सुरक्षेला व लोकशाही अखंडतेला हानी पोहोचवणे” यासाठी जाणीवपूर्वक केल्याचा आरोप आहे. (हेही वाचा : खळबळजनक : शाळेत तब्बल 20 फुटांचा किंग कोब्रा आढळला)