Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : आकुर्डीत कवी संमेलन संपन्न

पिंपरी चिंचवड : आकुर्डीत कवी संमेलन संपन्न

पिंपरी चिंचवड : अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा आकुर्डी पुणे तर्फे, ७ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पूर्वसंध्येला कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. छोटेखानी पण अत्यंत आटोपशीर झालेला हा कार्यक्रम, १५ कवी आणि कार्यकर्त्याच्या उपस्थितीत छान पार पडला.

महाराष्ट्र अनिस पुणे जिल्ह्याचे एकनाथ पाठक हे अध्यक्षस्थानी होते. आकुर्डी शाखेच्या कार्याध्यक्षा क्रांती दांडेकर यांनी सर्वांचे स्वागत केले आणि विषय मांडणी केली. प्रतिभासंपन्न कवयित्री शांताबाई शेळके यांचे जन्मशताब्दी वर्ष १९२२ – २०२२), कवयित्री आणि थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन (१० मार्च) आणि जागतिक महिला दिनाच औचित्य साधून हा कार्यक्रम ठरवण्यात आला. म्हणूनच महिलांविषयी च्या कविता हा विषय या संमेलनाचा होता.

आम आदमी पार्टीचा पिंपरीत जल्लोष, देशात आम आदमी पार्टी प्रमुख विरोधी पक्ष – चेतन बेंद्रे

प्रथम “गावात आलं नवंच वार, घर घर आज झालं साक्षर” हे गीत क्रांती दांडेकर यांनी घेतले. पाठोपाठ, कल्पना बंब यांनी “स्त्री मनाचा गुंता” व “उंबरठा”, श्रीकांत कदम यांनी “कुलदीपिका”, भावना फुलझेले यांनी “प्रिय सावू”, भरत बारी यांनी “ती आणि तिची कहाणी”, “उत्स्फूर्तपणे” आणि स्वाती बारी यांनी “स्त्री असण नसण सारखंच नसत” या  ७ स्वरचित कविता सदर केल्या. 

पुढच्या भागात महेंद्र गायकवाड यांनी “नारी” व “अशीही”, भावना फुलझेले यांनी एक उपहासात्मक कविता, गंगाधर सत्वधर यांनी “नवस” आणि प्रीती तांबे यांनी “जागाव थोड स्वतः साठी” अश्या इतर कवींच्या कविता सादर केल्या. सर्व कवितांच सादरीकरण उत्तम झालं. विषयांची हाताळणीही छान होती. 

देशातील सुज्ञ नागरिक भाजप बरोबर – महापौर उषा ढोरे

महाराष्ट्र अनिसचे सांस्कृतिक विभाग कार्यवाह योगेश कुदळे यांची “तू हसत रहा, कानठळ्या बसेपर्यंत हसत रहा” हि कविता क्रांती दांडेकर यांनी वाचून दाखवली. या कवितेतील स्त्रीची माणूस म्हणून जगण्याची जिद्द सगळ्यांना फार भावली. सर्व प्रस्थापितांना “फाट्यावर” मारण्याची तयारी पण आवडली. एकनाथ पाठक यांनी सादर केलेल्या कवितांचा घोषवारा घेत अध्यक्षीय समारोप केला. 

आकुर्डी शाखेचे सचिव स्वप्निल वाळुंज यांनी पुढे येणाऱ्या होळीच्या सणाच्या दिवशी पोळी दानाबद्दल सगळ्यांना आवाहन केले. महेंद्र गायकवाड यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संजय बारी, नवीन कार्यकर्ते संकेत भारमगुडे, संध्या देसले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात हातभार लावला. अल्पोपाहारचा आस्वाद घेत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

गंगाधर सत्वधर यांनी बुक स्टॉल लावला होता.  3 नवीन परिवारांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विषयाची पुस्तकं पोहोचली. तसेच सर्वांना समाजबंध संस्थेची प-पाळीचा पुस्तिका आणि नवीन व्यक्तींना अंनिप चा जानेवारी अंक भेट देण्यात आला.

– क्रांतिकुमार कडुलकर

दापोडी : श्रीमती‌ सी.के.गोयल कला वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी !

तलाठ्यांनो सावधान ! ..अन्यथा घरभाडे बंद करणार


संबंधित लेख

लोकप्रिय