जयपूर : अभिनेता शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांना पान मसाला ब्रँड ‘विमल’च्या जाहिरातीवरून (Vimal Pan Masala advt) नोटीस जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जयपूरमधील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने हा आदेश दिला असून, योगेंद्र सिंह नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
भ्रामक जाहिरातीचा आरोप (Vimal Pan Masala advt)
तक्रारदार योगेंद्र सिंह यांनी आरोप केला आहे की, ‘विमल’ पान मसालाच्या जाहिरातीत “बोलो जुबां केसरी” ही प्रसिद्ध टॅगलाइन वापरून ग्राहकांना दिशाभूल करणारा दावा केला जात आहे. या जाहिरातीत असे दर्शवले जाते की, पान मसाल्याच्या प्रत्येक दाण्यात केशर आहे आणि पाकिट उघडताच त्यातून केशर निघते. हा दावा चुकीचा असून, ग्राहकांची फसवणूक करणारा आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
बॉलिवूड कलाकारांना नोटीस
योगेंद्र सिंह यांच्या तक्रारीनंतर ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष ग्यारसीलाल मीना आणि सदस्य हेमलता अग्रवाल यांनी शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस पाठवण्याचा आदेश दिला आहे. या कलाकारांनी जाहिरातीसंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अक्षय कुमारने मागितली होती माफी
या जाहिरातीत सुरुवातीला अक्षय कुमार देखील सहभागी होता. मात्र, सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर त्याने जाहिरातीपासून स्वतःला वेगळे केले आणि सार्वजनिकरित्या माफी मागितली. त्यांनी स्पष्ट केले होते की, ते तंबाखूजन्य उत्पादनांचे समर्थन करत नाहीत आणि त्यांच्या तत्त्वांशी तडजोड करणार नाहीत.

हे ही वाचा :
संतापजनक : मद्यधुंद तरुणाचे सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य, व्हिडिओ व्हायरल
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, केला मोठा खूलासा
मोठी बातमी : मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा
महिलांसाठी खूशखबर : जागतिक महिला दिनानिमित्त पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत