पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे व आध्यात्मिक ईश्वरीय विश्वविद्यालय पुणे यांच्या सयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत चिखली पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिनानिमित्त अध्यात्मातून महिला सशक्तीकरण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (PCMC)
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष चिखली पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल कोळी होते.अध्यात्मिक ईश्वरीय विश्वविद्यालय तर्फे महिला भगिनींनी अध्यात्मावर मार्गदर्शन केले व स्त्री ही एक मोठी शक्ती आहे व या शक्तीला प्रत्येक महिलेने समजून घेतले पाहिजे असे प्रबोधन केले.
महिला दिनाचे महत्व सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल कोळी यांनी त्यांच्या मार्गदर्शन मधून सांगितले.
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पुष्पा बोत्रे यांनी अनुमोदन देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली व चिखली पोलीस स्टेशन मध्ये कार्यक्रम घेण्यास परवानगी दिल्याबद्दल चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांचे आभार मानले.


पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात व अमित कोकणे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेंद्र शेळके, अध्यात्मिक ईश्वरीय विश्वविद्यालय येथील महिला भगिनी व पुरुष यांनी हा कार्यक्रम उत्कृष्ट रित्या नियोजन करून पार पाडला. (PCMC)
सदर कार्यक्रमासाठी चिखली पोलीस स्टेशन येथील सुमारे चाळीस पोलीस कर्मचारींनी हजेरी लावली तर सामाजिक कार्यकर्त्या सारिका पवार, राजश्री शहा व नीता मसने यांनीही उपस्थिती दर्शविली. महिला दिनानिमित्त पोलीस व इतर महिलांना गुलाब पुष्प, केळी व आध्यात्मिक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. (PCMC)
अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम हे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघच्या वतीने नेहमीच आयोजित केले जातात तर या वर्षी पोलीस महिलांना त्यांच्या रोजच्या वर्दीतील पोलीस सोडून त्या एका कुटुंबाचा महत्वाचा भाग असतात व त्यांचे मानसिक संतुलन व्यवस्थित राहावे आणि जीवनाचा समतोल राखावा यासाठी अध्यात्म हा एक उत्कृष्ट पर्याय आहे म्हणून हा कार्यक्रम खास पोलीस स्टेशन मध्ये आयोजित केला होता. (PCMC)
आजची महिला ही सुरक्षित नसून समाजात रोजच वेगवेगळ्या घटना घडत आहेत म्हणून सरकारने लाडक्या बहिणीला पैसे देण्यापेक्षा तोच पैसा महिलांच्या सुरक्षेसाठी वापरावा व महिलांना सुरक्षित करावे असे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महिला सशक्तीकरण हे अध्यात्माच्या माध्यमातून एकदम सोप्या पद्धतीने होऊ शकते असे पुणे जिल्हा अध्यक्ष अमित कोकणे यांनी सांगितले.
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ ही संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवत असताना मानव अधिकार जनजागृती, समाजातील वंचित घटकांना मदत,अत्याचार विरोधी काम करणे, अन्यायाला वाचा फोडने,भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करणे आशा अनेक विषयांवर काम करत असते.
महिला सशक्तीकरण ही आजच्या काळाची गरज बनलेली असून असे अनोखे उपक्रम राबविण्याची संकल्पना सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे हे नेहमीच संस्थेला संबोधधित करत असतात तर सदर कार्यक्रम हा राबविल्याबद्दल संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार आणि पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी पुणे टीम चे कौतुक केले.