Friday, March 28, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : मायावतींचा पुतण्या आकाश आनंदची ‘बसपा’ पक्षातून हकालपट्टी

Mayawati Akash Anand : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) प्रमुख (मायावती Mayawati) यांनी त्यांच्या पुतण्या आकाश आनंद (Akash Anand) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. रविवारीच त्यांना पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात आले होते. सोमवारी, मायावती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून या निर्णयामागचे कारण स्पष्ट केले.

---Advertisement---

मायावतींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “काल बसपाच्या अखिल भारतीय बैठकीत, आकाश आनंद यांना राष्ट्रीय समन्वयक पदासह सर्व जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्यात आले. कारण ते पक्षाच्या हितापेक्षा पक्षातून काढून टाकण्यात आलेले त्यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्या प्रभावाखाली राहिले. त्यांना पक्षनिष्ठा दाखवण्याची आणि परिपक्वता सिद्ध करण्याची संधी होती. मात्र, त्यांच्या प्रतिक्रियांमधून त्यांचा स्वार्थ, अहंकार आणि गैर-मिशनरी वर्तन दिसून आले.”

गेल्या महिन्यात आकाश आनंद यांच्या सासरे अशोक सिद्धार्थ यांना बसपामधून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर आता आकाश आनंद यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. मायावती यांनी स्पष्ट केले की, “बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या स्वाभिमान चळवळीच्या हितासाठी आणि कांशीरामजी यांच्या शिस्तीच्या परंपरेचे पालन करून, आकाश आनंद यांना पक्षातून काढण्यात येत आहे.”

---Advertisement---

जोपर्यंत जिवंत, तोपर्यंत उत्तराधिकारी नाही (Akash Anand)

माजी मुख्यमंत्री मायावती यांनी यावेळी बसपासाठी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत माझा कोणताही उत्तराधिकारी पक्षात राहणार नाही.” या निर्णयानंतर बसपाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा :

माजी सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि इतर पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Jackfruit : फणस आणि कच्च्या फणसाची भाजी

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड, व्हिडिओही बनवत होते गुंड

अमेरिकेत मंदीचे संकेत; जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता

शेअर बाजारात 30 वर्षांतील सर्वात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 92 लाख कोटी बुडाले

महिलांसाठी खूशखबर : जागतिक महिला दिनानिमित्त पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles