Wednesday, March 12, 2025

पिंपरी-चिंचवडसाठी मुळशीतील पाणी आरक्षणाची मागणी

पिंपरी चिंचवड : वाढती लोकसंख्या आणि भविष्यकाळात पाण्याची मागणी लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरासाठी मुळशी धरणातून पाणी आरक्षणाला मंजुरी देण्याबाबत महायुती सरकारने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. (PCMC)

महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची आमदार लांडगे यांनी मुंबईत भेट घेतली. यावेळी पिंपरी-चिंचवडचा पाणी पुरवठा आणि नवीन जलस्त्रोत निर्मिती याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 30 लाखांच्या घरात आहे. शहरातील वाढते नागरीकरण आणि पाण्याची मागणी याचा विचार करता भविष्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त जलस्त्रोत निर्माण करण्याची नितांत आवश्यकता असून, मुळशी धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी पाणी आरक्षित करावे, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने राज्य शासनाला पाठवला आहे.

दरम्यान, पुण्यात कालवा समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे स्थानिक आमदारांनी पुण्यासाठी मुळशी धरणातून पाणी आरक्षणाबाबत मागणी केली आहे. त्यासंदर्भात कालवा समितीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्याला अनुसरून, पिंपरी-चिंचवडसाठीसुद्धा मुळशी धरणातून पाणी आरक्षीत व्हावे, याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंती आमदार लांडगे यांनी केली आहे.

पाणी मागणी व पुरवठा प्रमाण व्यस्त… (PCMC)

पिंपरी-चिंचवड शहराला सध्या पवना धरण आणि आंद्रा, भामा- आसखेड धरणातून पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प अद्याप सुरू नाही. तसेच, आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाचा दुसरा टप्पा अद्याप कार्यान्वयीत झालेला नाही. सबब, शहरातील पाण्याची मागणी आणि पुरवठा याचे प्रमाण व्यस्त असून, सोसायटीधारकांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. परिणामी, पाणी पुरवठा आणि टंचाई ही समस्या संवेदनशील बनली आहे.

प्रतिक्रिया :

पिंपरी-चिंचवडकरीता मुळशी धरणातून पाणी आरक्षण मिळावे. यासाठी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आहे. त्यासाठी पाणी पुन:स्थापना खर्च भरण्याचीही तयारी आहे. त्यामुळे मुळशी धरणातून पाणी आरक्षणाबाबत बैठकीत पिंपरी-चिंचवड शहराचाही सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी आग्रही मागणी आम्ही मंत्री महोदय यांच्याकडे केली असून, त्यावर सकारात्मक निर्णय होईल. ज्या महायुती सरकारने आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणी दिले, तसेच महायुती सरकार आता मुळशी धरणातूनही आम्हाला पाणी देईल, असा विश्वास आहे.

  • महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

हे ही वाचा :

मोठी बातमी : मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा

महिलांसाठी खूशखबर : जागतिक महिला दिनानिमित्त पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत

मायावतींचा पुतण्या आकाश आनंदची ‘बसपा’ पक्षातून हकालपट्टी

माजी सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि इतर पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Jackfruit : फणस आणि कच्च्या फणसाची भाजी

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड, व्हिडिओही बनवत होते गुंड

Related Articles

- Advertisement -

Latest Articles