Wednesday, March 12, 2025

मोठी बातमी : मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा

मुंबई : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या प्रकरणानंतर अखेर तब्बल ८२ दिवसांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो स्वीकारल्याची अधिकृत घोषणा प्रसारमाध्यमांसमोर केली.

पीएच्या मार्फत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा

धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा पीए (स्वीय सहायक) मार्फत सागर बंगल्यावर पाठवला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस विधानभवनाकडे रवाना होत होते. राजीनामा त्यांच्या पर्यंत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारत पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे सुपूर्द केला.

९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली होती. या प्रकरणात विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत हत्येच्या पार्श्वभूमीवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, काल समाजमाध्यमांवर दोषारोपपत्रातील फोटो समोर आल्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

आज सकाळपासूनच मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला वेग आला होता. काही सूत्रांनी कालच त्यांनी राजीनामा दिल्याचा दावा केला, तर विरोधकांनी त्यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी विधानसभेत लावून धरली होती.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

हे ही वाचा :

महिलांसाठी खूशखबर : जागतिक महिला दिनानिमित्त पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत

मायावतींचा पुतण्या आकाश आनंदची ‘बसपा’ पक्षातून हकालपट्टी

माजी सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि इतर पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Jackfruit : फणस आणि कच्च्या फणसाची भाजी

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड, व्हिडिओही बनवत होते गुंड

अमेरिकेत मंदीचे संकेत; जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता

Related Articles

- Advertisement -

Latest Articles