Wednesday, March 12, 2025

ब्रेकिंग : लाडकी बहिण योजनेचा हप्त्या ‘या’ दिवशी मिळणार, मंत्री अदिती तटकरेंनी दिली माहिती

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने (Ladki Bahin Yojana) अंतर्गत फेब्रुवारी २०२५ चा हप्ता येत्या ८ मार्च रोजी, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने वितरित केला जाणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून ८० लाख महिलांना वंचित ठेवण्यात आल्याच्या विरोधकांच्या आरोपांना त्यांनी ठामपणे फेटाळून लावताना सांगितले की, “८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्या दिवशी लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया ५ ते ६ मार्च दरम्यान सुरू होऊन ८ मार्चपर्यंत पूर्ण केली जाईल.”

राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने निवडणूक प्रचारादरम्यान या योजनेच्या मासिक रकमेचा वाढीव दर ₹२,१०० करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, यासंदर्भात विचारणा केली असता मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले की, “या निर्णयाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील.”

Ladki Bahin Yojana चा लाभ तब्बल २.५ कोटी महिलांपर्यंत

विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी सांगितले की, “गेल्या महिन्यात ‘माझी लाडकी बहिण’ योजनेचा लाभ तब्बल २.५ कोटी महिलांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळेच विरोधक नाराज झाले असून, निराशेतून निराधार आरोप करत आहेत.”

महिला दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या या अनुदान वितरणामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

हे ही वाचा :

महिलांसाठी खूशखबर : जागतिक महिला दिनानिमित्त पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत

मायावतींचा पुतण्या आकाश आनंदची ‘बसपा’ पक्षातून हकालपट्टी

माजी सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि इतर पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Jackfruit : फणस आणि कच्च्या फणसाची भाजी

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड, व्हिडिओही बनवत होते गुंड

अमेरिकेत मंदीचे संकेत; जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता

Related Articles

- Advertisement -

Latest Articles