Wednesday, March 12, 2025

सर्वोच्च न्यायालयाकडून रणवीर इलाहाबादियाला मोठा दिलासा

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर इलाहाबादियाला (Ranveer Allahbadia) मोठा दिलासा दिला आहे. पालकांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर बंदी घालण्यात आलेल्या ‘द रणवीर शो’ (The Ranveer Show) च्या प्रसारणास सर्वोच्च न्यायालयाने अटींसह परवानगी दिली आहे. मात्र, त्याने शोदरम्यान शालीनता राखली पाहिजे, अशी स्पष्ट अट न्यायालयाने घातली आहे.

Ranveer Allahbadia ला अटकेपासून संरक्षण

यासोबतच, न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत इलाहाबादियाला अटकेपासून संरक्षण दिले असून, त्यांना गुवाहाटी येथे चौकशीत सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, त्याला सध्या परदेशात जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. चौकशी प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

युट्यूबर रणवीर इलाहाबादियाने ‘इंडियाज गॉट टॅलेंट’शी संबंधित सुरू असलेल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने केंद्र सरकारला सोशल मीडियावरील सामग्री नियमन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाने रणवीर इलाहाबादियाला त्यांच्या पॉडकास्टमधील सामग्री सर्व वयोगटांसाठी योग्य बनवण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे इलाहाबादियाला मोठा दिलासा मिळाला आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

हे ही वाचा :

मायावतींचा पुतण्या आकाश आनंदची ‘बसपा’ पक्षातून हकालपट्टी

माजी सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि इतर पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Jackfruit : फणस आणि कच्च्या फणसाची भाजी

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड, व्हिडिओही बनवत होते गुंड

अमेरिकेत मंदीचे संकेत; जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता

शेअर बाजारात 30 वर्षांतील सर्वात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 92 लाख कोटी बुडाले

महिलांसाठी खूशखबर : जागतिक महिला दिनानिमित्त पर्यटकांसाठी ५० टक्के सवलत

Related Articles

- Advertisement -

Latest Articles