जुन्नर : ग्रामपंचायत निमगिरी (रानचरी) येथे गुरुवार दि 11 मार्च 2022 रोजी मनरेगाच्या माध्यमातून नाला बांध बंधीस्तीच्या कामांना सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायत निमगिरी, वनविभाग जुन्नर आणि किसान सभा जुन्नर यांच्या सहकार्यातून व प्रयत्नातून जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात रोजगार हमीची अनेक कामे मंजूर जात आहेत.
त्यानिमित्ताने आज वनविभाग जुन्नर निमगिरी विभागाचे वनरक्षक संजय गायकवाड, किसान सभेचे जुन्नर तालुका सचिव लक्ष्मण जोशी, रोजगार सेवक देवराम असवले यांनी कामाचे कामाचे उद्घाटन केले. वनरक्षक संजय गायकवाड यांनी मजुरांना कामाचे मोजमाप, आराखडा आणि कामाची पद्धती मजुरांना सांगितली.
जुन्नर : नाणेघाटात साहसी खेळ भरवणं पडलं महागात, वन विभागाने ठोठावला दंड
आदिवासींसाठी विशेष पदभरती मोहीम, अधिसंख्य कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारचा ‘हा’ निर्णय
यावेळी किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी म्हणाले, येत्या काळात निमगिरीतील मजुरांना पुढील तीन महिने किसान सभा काम मिळून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे जोशी म्हणाले.
निमगिरी गावातील मनरेगा अंतर्गत कामे मंजूर करण्यामध्ये ग्रामसेवक दिघे, सरपंच सुमनताई साबळे, उपसरपंच तान्हाजी असवले, फॉरेस्ट वनपाल फुलसुंदर, ग्रामपंचायत सदस्य संजय साबळे याचं मोलाचं सहकार्य मिळाले असल्याचे जोशी म्हणाले.
जुन्नर : माणकेश्वर येथील नवक्रांती महिला बचत गटाचा जिल्हा पातळीवर गौरव
तलाठ्यांनो सावधान ! ..अन्यथा घरभाडे बंद करणार
या कामाची रक्कम 51,000 एवढी असून 208 मुनुष्य दिवस हे काम मनरेगाच्या माध्यमातून वन विभागाने मजूर केले. त्यामुळे मजुरांना काम मिळाल्याने मजुरांनी किसान सभेचे आणि वन विभागाचे आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
या वेळी ग्रामस्थ शंकर साबळे, जानकु साबळे, पोपट साबळे, दुंदा साबळे, मारुती कोकणे, नामदेव साबळे बाळू साबळे, त्याचबरोबर रंजना साबळे, पाराबाई साबळे, संगिता साबळे, विमल साबळे, काळाबाई साबळे, भामाबाई साबळे, कांताबाई साबळे, उषा साबळे, अलका साबळे, विमल भवारी, सुनिता साबळे, सुनिता साबळे, वनिता भवारी, निंबाबाई आसवले, ललिता आसवले, साळाबाई साबळे, बबन मोघा साबळे, वनिता साबळे, सखुबाई साबळे, जनाबाई साबळे, पमाबाई साबळे, विमल साबळे, शांताबाई असवले, तुकाराम साबळे आदींसह मजूर उपस्थित होते.
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांची भरती!