Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : जागतिक महिला दिनानिमित्त 'आरोग्य व रक्तदान शिबिर'

पिंपरी चिंचवड : जागतिक महिला दिनानिमित्त ‘आरोग्य व रक्तदान शिबिर’

पिंपरी चिंचवड : आज दिनांक 10 मार्च रोजी सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त तसेच जागतिक महिला दिनानिमित्त, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे महिलांसाठी आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिर शिवनेरी हौसिंग सोसायटी घरकुल येथे आयोजित करण्यात आले होते.

आरोग्य शिबिराचा  60 ते 70 महिलांनी लाभ घेऊन उत्सूर्फ पणे सहभाग नोंदवला. तसेच काही  रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरांमध्ये डॉ.डी.वाय पाटील आयुर्वेदिक रुग्णालय यांची टीम तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय  यांचे रक्त्त पेडी विशेष सहकार्य लाभले. 

DYFI शहापूर तालुका अधिवेशन उत्साहात संपन्न !

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची राज्य सरकारच्या बजेटमुळे घोर निराशा, आझाद मैदानावर होणार “संताप मोर्चा”

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्या अपर्णा दराडे, सुषमा इंगोले, निर्मले येवले, रंजिता लाटकर तसेच डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया घरकुल शाखा च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. 

यावेळी अविनाश लाटकर, स्वप्निल जेवले, सचिन देसाई अननन्या लाटकर यांनी प्रयत्न केले, या कार्यक्रमाचा समारोप माकपा चे पुणे जिल्हा सचिव गणेश दराडे यांनी स्वतः रक्तदान करुन सर्व आलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्याचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले.

झोपडपट्टीला भीषण आग, आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यु तर 30 झोपड्या जळून खाक

संबंधित लेख

लोकप्रिय