Friday, March 14, 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस मध्ये घेतली क्लॉस श्वाब यांची भेट

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली. दावोसमध्ये सजविण्यात आलेले महाराष्ट्र पॅव्हेलियन आता पूर्णपणे सज्ज झाले असून, पुढील दोन दिवसांत विविध कार्यक्रम, सामंजस्य करार, आणि बैठकींची रेलचेल होणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस आणि क्लॉस श्वाब यांच्यात हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनांचा विकास, आणि उद्योगातील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान यासारख्या विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्राच्या विकासप्रकल्पांसाठी शुभेच्छा देताना श्वाब यांनी राज्याच्या प्रगतीचा गौरव केला. या भेटीत महाराष्ट्राला जागतिक मंचावर आणखी प्रभावी स्थान मिळवून देण्यावरही चर्चा झाली.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी होरॅसिसचे अध्यक्ष फ्रँक जर्गन रिक्टर यांचीही भेट घेतली. फ्रँक हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे माजी संचालक असून, मुंबईत जागतिक कंपन्यांची परिषद आयोजित करण्याबाबत त्यांनी पुढाकार दर्शविला. या परिषदेमुळे जागतिक उद्योगजगतातील नावीन्य आणि सहकार्य वाढण्यास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. याशिवाय, होरॅसिसचे मुंबईत मुख्यालय स्थापन करण्याबाबतही प्राथमिक चर्चा झाली.

CM Devendra Fadnavis यांचे ट्वीट

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये जागतिक गुंतवणूकदारांशी बैठका आयोजित करून राज्याच्या प्रगतीला गती देण्याचा सरकारचा मानस आहे. हरित तंत्रज्ञान, ईव्ही उत्पादन, आणि नाविन्यपूर्ण उद्योग प्रकल्प यावर भर देत महाराष्ट्राचे जागतिक गुंतवणुकीत स्थान भक्कम करण्यासाठी या भेटी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

दिनेश वाघमारे यांची राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात कोर्टाने पोलिसांना ठरवलं दोषी

राज्यातील ‘या’ ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, प्रशासनाकडून ‘अलर्ट झोन’ घोषित

अभिनेत्री हेमा मालिनी यांना ‘पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान पुरस्कार’ प्रदान

करणवीर मेहराने ‘बिग बॉस १८’ची ट्रॉफी जिंकत रचला इतिहास

भालाफेकपटू नीरज चोप्रा अडकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो व्हायरल

धक्कादायक : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ तरुणांना एसटी बसने चिरडले

Related Articles

- Advertisement -

Latest Articles