Wednesday, February 12, 2025

PCMC : वाय नॉट अस! ‘पर्पल जल्लोष’मध्ये दिव्यांग कलाकारांच्या ‘फॅशन शो’ने वेधले सर्वांचे लक्ष

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) : रॅम्पवरून सांस्कृतिक जगताकडे टाकलेले पाऊल… प्रत्येक पावलात दिसून येणारा आत्मविश्वास… सौंदर्याला भूरळ पडेल अशी चेहऱ्यावरील आश्वासक भावना… अन् रसिकांची उत्स्फुर्तपणे मिळालेली दाद… हे विलोभनीय दृश्य ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमात सादर झालेल्या ‘वाय नॉट अस!’ या फॅशन शो च्या माध्यमातून दिसून आले. (PCMC)

पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी १७ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ याकाळात ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्र येथे सुरू असलेल्या या कार्यक्रमामध्ये दिव्यांग व्यक्तींकडून ‘वाय नॉट अस’ या फॅशन शोचे सादरीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाचे सचिव राजेश अगरवाल, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, उप आयुक्त विठ्ठल जोशी, अण्णा बोदडे, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, तानाजी नरळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, सल्लागार विजय कान्हेकर, अभिजित मुरुगकर, दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी मानव कांबळे, दत्तात्रय भोसले, राजेंद्र वाघचौरे, संगीता जोशी तसेच विविध राज्यातील दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Purple jallosh PCMC

फॅशन शो मध्ये संगीता जोशी-काळभोर, भाग्यश्री मोरे, जयश्री भोसले, संगीता सुपल, आशा माने, वैशाली पवार, वैशाली शिंदे, प्रशांत नागे, प्रशीश शेट्टी, संकल्प बोत्रे, शिल्पा पांचाळे, जान्हवी जवळगे, प्रदीप साखरे, राजेश जाधव, बाबूराव अहिरे या दिव्यांग कलाकारांनी सहभाग घेतला होता. दिव्यांग व्यक्तींच्या या फॅशन शो च्या निमित्ताने त्यांना रॅम्पवर चालताना बघणे, हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरले. दिव्यांगांचा आत्मविश्वास देखील यातून दिसून आला.

कोट :

पर्पल जल्लोष महाउत्सवात दिव्यांग व्यक्तींचा फॅशन शो कार्यक्रम आयोजित करण्यामागे दिव्यांग व्यक्तींना प्रेरणा देणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणे, त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे, हा होता.

हा शो फॅशनच्या पलीकडे जाऊन समावेशकतेचा संदेश देणारा ठरला आहे. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारा हा फॅशन शो ठरला असून यामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचा आत्मविश्वास हा वाखण्याजोगा आहे.

शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका


Related Articles

- Advertisement -

Latest Articles