MLA Sunil Shinde accident : शिवसेना (यूबीटी) आमदार सुनील शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. आमदार सुनील शिंदे यांच्या गाडीला बेस्ट बसने धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
आमदार सुनील शिंदे यांच्या गाडीच्या अपघाताची घटना मुंबईतील दादर परिसरात घडली. अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच आमदार शिंदे हे गाडीतून उतरून शाखेकडे चालत जात होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गाडीत उपस्थित असलेला चालकही सुखरूप असल्याची माहिती आहे.
Sunil Shinde accident ; वाहनावरील ताबा सुटल्यामुळे अपघात
बेस्ट बसच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. मुंबईत याआधीही बेस्ट बसमुळे अनेक अपघात झाले आहेत. डिसेंबर 2024 मध्ये कुर्ला परिसरात घडलेल्या एका मोठ्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता, तर 49 जण जखमी झाले होते.
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी वाहतूक पोलिसांनी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांकडून मागणी होत आहे. बेस्ट प्रशासनाने चालकांना योग्य प्रशिक्षण देणे, त्यांचे आरोग्य तपासणे, तसेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर देणे गरजेचे आहे.


हे ही वाचा :
चार हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेतील अर्ज घेतले मागे, वाचा काय आहे कारण !
मूत्र पाजलं, काळं फासलं, मिरचीची धुरी दिली; ७७ वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेची छळवणूक
इन्फोसिसमध्ये 20,000 हून अधिक पदांसाठी भरतीची घोषणा
भारतीय स्टेट बँक अंतर्गत 600 पदांची भरती, पात्रता – पदवी
पुणे : नारायणगाव येथे तीन वाहनांचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू, मृतांपैकी पाच जण एकाच गावातील
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू; १५,००० पदे भरली जाणार
लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्त्या कधी ? महत्वाची माहिती समोर