Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड येथे मोफत डोळ्यांचे ऑपरेशन शिबिर, ४ दिवसात घेतला ११५८ नागरिकांनी...

पिंपरी चिंचवड येथे मोफत डोळ्यांचे ऑपरेशन शिबिर, ४ दिवसात घेतला ११५८ नागरिकांनी लाभ

६६३ नागरिकांना मोफत चष्मे वाटप

१२६ नागरिकांचे होणार मोतीबिंदू ऑपरेशन

पिंपरी चिंचवड : चिंचवडगाव येथील प्रसन्न मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट व एच व्ही देसाई नेत्रपेढी यांचे संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन आणि मोफत चष्मे वाटप शिबीर प्रभाग क्रमांक २६ मध्ये आयोजित करण्यात आले होते.

प्रभागातील दळवीनगर, बिजलीनगर, शिवनगरी, चिंचवडेनगर या भागात नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी सोबतच चष्मे वाटप आणि मोतीबिंदू ऑपरेशन शिबीर राबविण्यात आले. चारही दिवस अत्यंत उस्फुर्त प्रतिसादात नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या चार दिवसात एकूण ६६३ नागरिकांना मोफत चष्मे देण्यात आले. तसेच १२६ नागरिकांना मोतीबिंदू ऑपरेशनसाठी पुढील तपासणीसाठी तारखा देण्यात आल्या असून लवकरच या सर्वांचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. 

यावेळी भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष शेखर चिंचवडे, भाजप नेते नामदेव ढाके, आबा सोनावणे, अनिल तारू यांच्या हस्ते नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन, प्रसन्न मेडिकल चॅरीटेबल ट्रस्टचे सहकार्य लाभले.

यावेळी राजेंद्र चिंचवडे, दत्ता भगवान चिंचवडे, उत्तम चौरे, जयवंत भोसले, नामदेव कुंभार, विशाल गडगुळ, विजय थोरवे, विशाल वाणी, रमेश पिसे, कृष्णा वाघमारे, फणसाळकर, हिंदुराव जाधव, सतपाल गोयल, हनुमंत हाके सर, नाना दीवाने यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय