पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या अत्यंत आक्रमक आणि अभ्यासू नेत्या भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना विधानपरिषदेसाठी भाजपने उमेदवारी देऊन सर्वांना आश्चर्यकारक धक्का दिला आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणूनही ओळखल्या जातात.
उमा खापरे या पिंपरी-चिंचवडच्या आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेविका म्हणून चांगले काम केलं आहे. 2001-2002 मध्ये त्या पिंपरी चिंचवड पालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या. त्यांनी भाजपमध्ये महिला मोर्चा प्रदेश सचिवपदासह संघटनेत विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. भाजपमधील जुन्या नेत्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांच्या उमेदवारी मुळे पिंपरी चिंचवड शहरासाठी प्रथमच महिला आमदार मिळणार आहेत.
नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये 876 जागांसाठी भरती, पुणे येथे 10 वी, 12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज !
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी