Sunday, December 22, 2024
Homeराजकारणभाजपने पंकजा मुंडे यांना दिला मोठा धक्का, मुंडेंचा पत्ता केला कट

भाजपने पंकजा मुंडे यांना दिला मोठा धक्का, मुंडेंचा पत्ता केला कट

मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे, विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस रंगणार आहे. या निवडणूकीसाठी भाजपने पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे, मात्र त्यात त्यामध्ये पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश नसल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहे.

भाजपने बुधवारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, प्रसाद लाड व माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेनंतर विधान परिषदेतही त्यांना डावलण्यात आलं आहे. मुंडे यांच्या जागी उमा खापरेंना संधी देण्यात आली आहे.

राज्यसभा निवडणूकीत माकप महाविकास आघाडीच्या पाठिशी, कॉम्रेड विनोद निकोले या घोडेबाजारापासून दूर

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत संधी मिळाली तर त्याचं सोनं करेन, असं म्हटलं होतं. मात्र आता पुन्हा भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या नावामधून पंकजा मुंडे यांचे नाव वगळण्यात आले आहे. 

कोण आहे उमा खापरे ?

उमा खापरे या भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. उमा खापरे या पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन वेळा नगरसेविका होत्या. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत विरोधी पक्ष नेत्या म्हणूनही काम पाहिलं आहे.

या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी  2 जूनला अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 9 जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 20 जून रोजी निवडणूक होणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सहाय्यक शिक्षक पदांसाठी भरती, 11 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सरकारी नोकरी : इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत 8106+ जागांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज

नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख

लोकप्रिय