मुंबई : राज्यात राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. या विधान परिषद निवडणुकीसाठी प्रमुख पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत असताना आता काँग्रेसने देखील आपले उमेदवार जाहीर केले आहे.
राज्यात २० जून रोजी विधान परिषद निवडणुक होत आहे. या निवडणूकीसाठी काँग्रेसकडून दोन उमेदवार जाहीर केले आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) आणि काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसनं संधी दिली आहे. काँग्रेसने एक प्रसिद्धी पत्रक काढून यांना उमेदवारी दिल्याचं जाहीर केलं आहे.
या विधान परिषद निवडणूकीसाठी 9 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहे, 10 जूनला निवडणूक अर्जांची छाननी केली जाईल. 13 जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. 20 जून रोजी मतदान पार पडेल. त्याच दिवशी सायंकाळी पाच नंतर मतमोजणी होणार आहे.
राज्यसभा निवडणूकीत माकप महाविकास आघाडीच्या पाठिशी, कॉम्रेड विनोद निकोले या घोडेबाजारापासून दूर
सरकारी नोकरी : इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत 8106+ जागांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज
ठाणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी