मुंबई, दि. 20 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कम्बाईंड डिफेन्स सर्विसेस (CDS) या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण दिले जाते. नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतीसाठी २० जानेवारी २०२५ ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत सी.डी.एस.(CDS) प्रशिक्षणाचे क्र. ६४ आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात निशुल्क प्रशिक्षणासह, निवास व भोजन उपलब्ध असेल अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आली आहे. (Armed Forces)
मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे ६ जानेवारी २०२५ रोजी मुलाखतीस सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हजर रहावे. Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवरील सी.डी.एस.-६४ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट संपूर्ण माहितीसह आणावी.
सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खालील नमूद पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावे.
उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सी. डी. एस. (CDS) या परीक्षेकरिता ऑनलाईन द्वारे अर्ज केलेला असावा.
अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सअॅप क्र. 9156073306 (प्रवेश मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे.
Armed Forces
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/Telegram-GIF.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हे ही वाचा :
पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता पदवी; इंजिनिअरिंग पदवी
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; पगार 40000 रुपये
IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी
सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत मोठी भरती
केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांची भरती
AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेसमध्ये विविध पदांची भरती
Navy Bharti : भारतीय नौदल अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
UPSC मार्फत 457 जागांसाठी भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी
पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत भरती
Clerk Bharti : “या” सहकारी बँकेत लिपिक पदासाठी भरती
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड पदांची भरती
UPSC मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी NDA & NA) परीक्षा; जागा 406
नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अंतर्गत 275 जागांसाठी भरती
बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती