Sunday, January 5, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAlandi : आळंदीत पिसाळलेला कुत्रा चावल्याने ६६ जखमी

Alandi : आळंदीत पिसाळलेला कुत्रा चावल्याने ६६ जखमी

आळंदीत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी (Alandi)

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील आळंदी नगरपरिषद हद्दीतील भागीरथी नाल्यावर पिसाळलेला कुत्रा चावल्याने आळंदीतील लहानग्या पासून जेष्ठ नागरिकांना पर्यंत ६६ जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती आळंदी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी दिली. (Alandi)

आळंदी येथील घाणीचे साम्राज्य असलेल्या भागीरथी नाल्यावरून येजा करीत असताना पिसाळलेला कुत्रा अनेकांना चावल्याने अनेक जण जखमी झाले. यात रविवारी ( दि. १५ ) २० जणांना कुत्रा चावल्याने तसेच सोमवारी ( दि. १६ ) दुपारी दोन पर्यंत ४४ जणांना तर दुपारी दोन नंतर आणखी २ जणांना कुत्रा चावल्याने नागरिकांत कुत्र्याची दहशत पसरली.

भागीरथी नाल्यावर अखेर कुत्रा जखमी झाल्याने तसेच त्याचे अंगावर पाणी टाकत त्यास बांधून ठेवण्याची मोठी कसरत रहिवासी नागरिकांनी केली. दरम्यान आळंदी नगरपरिषद प्रशासनास कळवण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवड पशु वैद्यकीय विभागाचे लोखंडी पिंज-यात कुत्र्यास जेरबंद करून पुढील उपचारास सुपूर्द करण्यात आल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले. (Alandi)

यावेळी परिसरातील नागरिक विजय गावडे, महेश पाचुंदे, नेचर फाउंडेशचे अध्यक्ष भागवत काटकर, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आदींनी संबंधित ठिकाणी तसेच प्रशासनास कळवीत दक्षता घेत कुत्रास पिंज-यात सुपूर्द केले.

आळंदीत विविध ठिकाणी झालेल्या कुत्रा चावण्याचे घटनेत ६६ जण जखमी झाले. यामुळे परिसरात नागरीकांसह भाविकांत संताप पसरला. आळंदीतील मोकाट कुत्र्यांचे भटकण्यातुन नाराजी पसरली आहे.

प्रकरणी भाविक, नागरिकांची सुरक्षितता जोपासण्याचे कार्याचा भाग म्हंणून सार्वजनिक रस्त्यावरील, जागेतील मोठ्या प्रमाणात भटकणाऱ्या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी विविध सेवाभावी संस्थासह आळंदी शहर भाजपचे संघटन सरचिटणीस भागवत काटकर यांनी केली आहे.

या संदर्भात आळंदी शहर भाजपचे वतीने आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचे लक्ष वेधण्यात येत असल्याचे भागवत काटकर यांनी सांगितले. आळंदी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यासाठी प्रशासनाने कामकाज करण्याची मागणी करण्यात आली.

आळंदीतील सार्वजनिक मोकळ्या जागा, रस्ते, इंद्रायणी नदी घाट, मरकळ रस्ता,चावडी चौक, वडगाव रस्ता, भैरवनाथ चौक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे फिरत असतात. यामुळे दिवसा, रात्री अपरात्री मोकाट कुत्रे नागरिकांचे अंगावर धावून जातात. वडगाव चौक, चावडी चौक, मंदिर परिसर, मरकळ रस्ता, शालेय परिसरात फिरत असलेली मोकाट कुत्रे यामुळे शाळेची मुले, मुली, जेष्ठ नागरिक, प्रवासी, वारकरी भाविक यांना रहदारीला गैरसोयीचे व भीतीदायक होत आहे. अनेकांना यामुळे यापूर्वी हि दुखापती झाल्या आहेत.

भाविक, नागरिकांचे आरोग्याची काळजी घेत आळंदी नगरपरिषदेने शहरातील मोकाट कुत्रे यांना अँटी रेबीजीकरण करण्याची गरज आहे. मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांना रहदारीला त्रासदायक होणार नाही, याची काळजी घेण्याची मागणी करण्यात आल्याचे भागवत काटकर यांनी सांगितले.

आळंदीतील नागरिकांकडे वैयक्तिक मालकीचे कुत्रे असतील त्यांचे गळ्यात पट्टे आणि त्यांचे पासून नागरिकांना, शेजारी यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे सूचनादेश नगरपरिषदेने काढावेत. तसेच खाजगी कुत्रे यांची अभिलेखात नोंद नसल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

भाविक, नागरिक तसेच शालेय मुले यांचे सुरक्षिततेस प्राधान्य देऊन तात्काळ उपाय योजना न केल्यास या मागणीसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

प्रदक्षिणा रोडवर भटक्या कुत्र्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. प्रदक्षिणा मार्गावरील श्री विठ्ठल रुख्मिणी चौकात शाळा आणि क्लासेस साठी ये- जा करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर ही मोकाट कुत्री सर्रास धावून जातात. यामुळे अनेक लहान मुलेही यांची शिकार ठरतात. यामुळे प्रशासनाने वेळीच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

त्याच बरोबर पाळीव कुत्रे पण नागरिक रस्त्यावर, शेजारील मोकळ्या जागेत, सार्वजनिक ठिकाणी त्यांना शौचालय करण्यास घेऊन जातात. यामुळे शेजारील लोकांना देखील याचा त्रास सहन करावा लागून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

यामुळे नागरिक मोकाट कुत्र्याच्या त्रासास वैतागले असून नगरपरिषद प्रशासनाने याची दखल घेण्याची मागणी आळंदीत जोर धरत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय