बालाजी इंग्लिश स्कुलमध्ये क्रीडा सप्ताहाचे उदघाटन (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : आजचे विद्यार्थी हे देशाची खरी शान आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांमधील गुणांची चुणूक दिसून येत असते. पालक – शिक्षकांनी मुलांमधील कला गुण ओळखून त्यांच्या गुणांचा विकास करावा.असे उदगार ऑलिंपिक वीर बाळकृष्ण आकोटकर यांनी काढले. चिखली मोरे वस्ती येथील बालाजी इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. (PCMC)
यावेळी बालाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा जरे, संचालक सचिन जरे, मुख्याध्यापिका ज्योत्स्ना फाळके यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून करण्यात आले. यावेळी शिवकालीन युद्धकलेतील लाठीकाठी, सिलंबम, तलवारबाजी, दांडपट्टा,चक्री तसेच मार्शल आर्टची प्रात्यक्षिके भक्ती दहिफळे, माही चौधरी, हेमनात पिल्लाई, गणेश मोरे या विद्यार्थ्यांनी करून दाखवली.
सचिन जरे म्हणाले कि, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मन आणि शारीरिक सुदृढ असणे गरजेचे आहे. निरोगी आयुष्य जगण्यासाठी मनाला अभ्यास आणि शरीराला व्यायामाची गरज असते. आयुष्यात एकतरी छंद जोपासला पाहिजेत. त्यातून मनोरंजनही होईल, आणि मनही आनंदी, शरीर सुदृढ राहील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योत्स्ना फाळके यांनी केले. सूत्रसंचालन असमा खान, वैष्णवी कांबळे, जॉन ओहोळ यांनी केले तर आभार राधिका पवार हिने मानले. क्रीडा शिक्षक चैतन्य शिगवण व प्रफुल्ल प्रधान यांनी विशेष परिश्रम घेतले.
हे ही वाचा :
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, कुणाला किती मंत्रीपदं मिळणार?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून आढावा
मोठी बातमी : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मोठी बातमी : बॉटल बंद पाणी ‘अतिधोकादायक’ यादीत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधीची जोरदार तयारी