Monday, December 23, 2024
Homeराज्यराज्य सरकार आमदारांना मोफत घरे देणार नाही तर "इतके" घेणार पैसे, गृहनिर्माण...

राज्य सरकार आमदारांना मोफत घरे देणार नाही तर “इतके” घेणार पैसे, गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी केले स्पष्ट

मुंबई : मुंबई : गेल्याच आठवड्यात आमदार निधीत एक कोटी वाढ करून तो पाच कोटी रुपये करण्यात आल्यावर, आता राज्यातील तीनशे आमदारांना मुंबईतील गोरेगाव परिसरात घरे देण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. एमएमआर रिजनमधील (मुंबई महानगर प्रदेश म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील) आमदारांना वगळून ग्रामीण भागातील आमदारांना ही घरे दिली जातील असे जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले. या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही स्वागत केले.

प्रख्यात विचारवंत सुधीर बेडेकर यांचे निधन !

या घोषणेनंतर सोशल मीडियावर महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. यावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सावरासावर केली आहे. आव्हाड यांनी ट्वीट करून म्हटले आहे कि, आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च 70 लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे, असे ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

दरम्यान, वरळीतील बीडीडी चाळीचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर, नायगांव येथील बीडीडी चाळीला शरद पवार नगर आणि ना. म. जोशी बीडीडी चाळीला राजीव गांधी नगर नाव देण्यात आले असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज सभागृहात केली.

ब्रेकिंग : आठवड्यात सलग तिसऱ्यांदा पेट्रोल – डिझेल च्या दरात वाढ !

केंद्र सरकारच्या निषेधार्थ दि. २८, २९ मार्चला कामगार संघटनांचा देशव्यापी संप – डॉ. कराड

संबंधित लेख

लोकप्रिय