पुणे : मागोवा आणि तात्पर्य या मासिकाचे संपादक आणि सत्तरीच्या दशकामधील मागोवा गटाचे प्रमुख मार्गदर्शक व प्रख्यात मार्क्सवादी विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर यांचे आज पहाटे पुण्यामध्ये अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.
पुणे येथील समाज विज्ञान अकादमीचे ते विद्यमान विश्वस्त अध्यक्ष होते.
“कॉ. सुधीर बेडेकर यांनी ‘मागोवा’ आणि ‘तात्पर्य’ मासिकांद्वारे आणि ‘मागोवा’ गटाद्वारे सत्तरीच्या दशकातील महाराष्ट्रातील तरुण पिढीला मार्क्सवादी विचारांकडे वळवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य केले. पुण्याच्या समाज विज्ञान अकादमीतर्फे त्यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य आजही अविरत सुरू आहे. सुधीर यांनी ऐंशीच्या दशकात एसएफआयची काही राज्य शिबिरेही घेतली. कॉ. सुधीर यांच्या जाण्याने डाव्या वैचारिक चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे.”
– डॉ. अशोक ढवळे, केंद्रीय कमिटी सदस्य
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट !
ब्रेकिंग : आठवड्यात सलग तिसऱ्यांदा पेट्रोल – डिझेल च्या दरात वाढ !
केंद्र सरकारच्या निषेधार्थ दि. २८, २९ मार्चला कामगार संघटनांचा देशव्यापी संप – डॉ. कराड