Wednesday, November 20, 2024
Homeताज्या बातम्याविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर

Vidhansabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सध्या जोरात सुरू असून, येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक नुकताच पार पडला, आणि अनेक बंडखोर उमेदवारांनी त्यांच्या अर्जांची माघार घेतली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेणारे उमेदवार :

भाजप : गोपाळ शेट्टी (बोरीवली), विश्वजीत गायकवाड (लातूर), विजयराज शिंदे (बुलढाणा), किशोर समुद्रे (मध्य नागपूर), अमित घोडा (पालघर), शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे (सांगली), किरण ठाकरे (कर्जत खालापूर), संगीता ठोंबरे (केज), प्रतिभा पाचपुते (श्रीगोंदा),संदीप सरोदे (कोटोल)

शिवसेना ठाकरे गट : बाबुराव माने (धारावी), उदय बने (रत्नागिरी), रणजीत पाटील (परंडा), कुणाल दराडे (येवला), मकरंदराजे निंबाळकर (उस्मानाबाद).

शिवसेना शिंदे गट : स्विकृती शर्मा (अंधेरी पूर्व), जगदीश धोडी (बोईसर), प्रशांत लोखंडे (श्रीरामपूर), सुरज सोळुंके (उस्मानाबाद), अविनाश राणे (अणुशक्तीनगर), राजू परावे (उमरेड), धनराज महाले (दिंडोरी).

काँग्रेस :मधू चव्हाण (भायखळा), मदन भरगड (अकोला), तानाजी वनवे (नागपूर पूर्व), सुहास नाईक (शहादा तळोदा), विश्वनाथ वळवी (नंदुरबार), हेमलता पाटील (नाशिक मध्य), दिलीप माने (सोलापूर), मधुरिमाराजे (कोल्हापूर उत्तर विधानसभा), राजश्री जिचकार (काटोल).

अजित पवार गट :नाना काटे (चिंचवड), सुजित झावरे पाटील (पारनेर), राजेभाऊ फड (परळी), नरेश अरसडे (काटोल), सुबोध मोहीते (काटोल), अब्दुल शेख (नेवासा).

शरद पवार गट : जयदत्त होळकर (येवला), संदीप बाजोरिया (यवतमाळ).

अपक्ष : जयदत्त क्षीरसागर (बीड), तनुजा घोलप (देवळाली).

इतर पक्ष : अंकुश पवार (मनसे, नाशिक मध्य), वृषभ वानखेडे (आम आदमी पार्टी, काटोल), जिशान हुसेन (वंचित बहुजन आघाडी, अकोला).

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक बंडखोर उमेदवारांनी त्यांच्या अर्जांची माघार घेतली आहे.ज्यामुळे राज्यातील निवडणुकीचे चित्र थोडेसे बदलले आहे.

Vidhansabha Election

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते;राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय