सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राहणार उपस्थित (PCMC)
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी साधणार ‘वसूबारस’चा शुभमुहूर्त
स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून भव्य रॅलीद्वारे भरणार उमेदवारी अर्ज
हजारोंच्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक राहणार उपस्थित
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – दिवाळीच्या पहिल्या दिवशी अर्थात वसूबारस दिनाचा शुभमुहूर्त साधून भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय – मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप हे सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. (PCMC)
यावेळी सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार अश्विनी जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहराध्यक्ष निलेश तरस, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर हे उपस्थित राहणार आहेत.
सोमवारी सकाळी ९ वाजता लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन भव्य महारॅलीचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर पिंपळे गुरव बस स्टॉप, भगतसिंग चौक, जवळकर नगर येथून पिंपळे सौदागर येथील स्वराज हॉटेल, रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, तापकीर चौक, काळेवाडी मार्गे थेरगाव येथील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयापर्यंत ही भव्य रॅली काढण्यात येणार आहे. (PCMC)
या भव्य महारॅलीत महायुतीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मात्र चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन मला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन शंकर जगताप यांनी यावेळी केले आहे. (PCMC)
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत शंकर जगताप यांच्या नावाची घोषणा झाली होती. त्यानंतर संपूर्ण चिंचवड मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यानंतर कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे प्रचाराला लागले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच शंकर जगताप यांचा प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडणार आहे.
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हेही वाचा :
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर
पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ
मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव
अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन
दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?
पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?
अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?
मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित